Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stomach Infection: पोटाचा संसर्ग की फूड पॉइझनिंग? स्टूल टेस्ट सांगते आजाराचं खरं कारण

Food Poisoning Symptom: पोट दुखणे किंवा अतिसार होणे म्हणजे प्रत्येक वेळी फूड पॉइझनिंग झाले आहे असे नाही. व्हायरस, बॅक्टेरिया, परजीवी किंवा इतर कारणांमुळेही पोटाचा संसर्ग होऊ शकतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 24, 2026 | 07:43 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • पोटाचा संसर्ग की फूड पॉइझनिंग?
  • स्टूल टेस्ट सांगते आजाराचं खरं कारण
  • स्टूल टेस्ट का महत्त्वाची आहे?
बर्‍याचदा लोकांना असं वाटतं की उलट्या आणि जुलाब (Loose Motion) झाले म्हणजे नक्कीच फूड पॉइजनिंग झालं आहे. पण प्रत्येक वेळी असंच असेल असं नाही. पोटाचा संसर्ग (Gastroenteritis) अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो. फूड पॉइझनिंग म्हणजे साधारणपणे दूषित (Contaminated) किंवा संक्रमित (Infected) अन्न किंवा पेयांमुळे होणारा आजार. पण गॅस्ट्रोएन्टेरायटिस (Gastroenteritis) हा एक व्यापक शब्द आहे. यामध्ये पोट आणि आतड्यांना आलेली सूज (Inflammation) समाविष्ट होते, जी बॅक्टेरिया, व्हायरस, परजीवी (Parasites) किंवा इतर काही संसर्ग नसलेल्या कारणांमुळेही होऊ शकते. पोटाच्या संसर्गामागे नेमकं कारण काय? जाणून घेऊयात, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडचे असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट,डॉ. निरंजन पाटील यांच्याकडून.

साधा सर्दी-खोकला समजून दुर्लक्ष करताय? डोके आणि मानेच्या कर्करोगाची सुरुवातीची ‘ही’ 5 लक्षणे ओळखा

व्हायरल इन्फेक्शन

व्हायरस हे पोटाच्या संसर्गाचं सर्वात सामान्य कारण आहे. हे संक्रमित वस्तूंच्या (Fomites), दूषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून सहज पसरू शकतात. उदाहरणे: रोटाव्हायरस (Rotavirus), नोरोव्हायरस (Norovirus)

याची प्रमुख लक्षणे

  • आजार अचानक सुरू होतो.
  • साधारण ३ ते ७ दिवसांत बरा होतो.
  • एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे खूप वेगाने पसरतो.
  • रोटाव्हायरस हा लहान मुलांमध्ये आणि बालकांमध्ये जुलाब होण्याचं सर्वात सामान्य कारण आहे.
  • नोरोव्हायरस हा जगभरात फूडबॉर्न इन्फेक्शनचं प्रमुख कारण मानला जातो, विशेषतः डे-केअर सेंटर, क्रूझ शिप किंवा जिथे अनेक लोक एकत्र राहतात अशा ठिकाणी.
  • याशिवाय Calicivirus, Astrovirus, Adenovirus, Enterovirus हे व्हायरसही पोटाचा संसर्ग करू शकतात.

या बॅक्टेरियामुळेही पोटाचा संसर्ग होऊ शकतो

  • शिगेला (Shigella)
  • साल्मोनेला (Salmonella)
  • कॅम्पिलोबॅक्टर (Campylobacter)
  • ई. कोलाई (E. coli – EHEC, EPEC)
  • व्हिब्रिओ (Vibrio)
  • क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल (Clostridium difficile)

मुख्य लक्षणे

  • काही तासांतच लक्षणे सुरू होतात.
  • पोटात तीव्र दुखणे किंवा मुरडा येतो.
  • ताप येऊ शकतो.
  • काही वेळा शौचात रक्तही येऊ शकते.
  • परजीवींमुळे (Parasites) होणारा संसर्ग
  • कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं अन्न, विशेषतः मांस
  • दूषित माती
  • परजीवींची अंडी किंवा अळ्या असलेलं पाणी

मुख्य लक्षणे

  • आजार हळूहळू सुरू होतो.
  • अनेक आठवडे किंवा महिने टिकू शकतो.
  • शरीरात पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते.
  • अॅनिमिया किंवा व्हिटॅमिन B12 ची कमतरता होऊ शकते.
  • वजन कमी होऊ शकतं.

काही सामान्य परजीवी संसर्ग

  • जिआर्डियासिस (Giardiasis): दुर्गंधीयुक्त सैल शौच होणे आणि काही वेळा जुलाब व बद्धकोष्ठता आलटून-पालटून होणे.
  • एंटअमीबा हिस्टोलिटिका (Entamoeba histolytica): यामध्ये रक्तमिश्रित जुलाब (Dysentery) होऊ शकतात.
  • क्रिप्टोस्पोरिडियम (Cryptosporidium) आणि सायक्लोस्पोरिडियम (Cyclospora): हे विशेषतः HIV सारख्या कमी प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांमध्ये पाण्यासारखे जुलाब होण्याचं कारण ठरू शकतात.
  • राउंडवर्म (Ascaris), हुकवर्म (Ancylostoma duodenale), टेपवर्म (Taenia, Diphyllobothrium) हे देखील पोटाचे संसर्ग करू शकतात.
काही वेळा पोटाच्या तक्रारी फूड पॉइझनिंगसारख्या वाटतात, पण त्यामागे कोणताही जंतुसंसर्ग नसतो. यामध्ये खालील कारणांचा समावेश होतो:
  • फूड इंटॉलरन्स
  • लॅक्टोज इंटॉलरन्स
  • ग्लूटेन इंटॉलरन्स (सिलिअॅक डिसीज)
  • आतड्यांमधील दाहजन्य आजार
  • इन्फ्लेमेटरी बाऊल डिसीज (IBD)
  • क्रोहन डिसीज
  • अपेंडिसायटिस
  • अन्न नीट न पचणे (Food Malabsorption)
  • विषारी पदार्थ (Toxins)
  • काही वनस्पतींचे विष
  • विषारी मशरूम
  • कोकेन
  • दूषित किंवा खराब मासे खाल्ल्यामुळे होणारे Tetrodotoxin विषबाधा
  • काही औषधांमुळे
  • विशेषतः अँटिबायोटिक्समुळे होणारे जुलाब
  • मलेरिया
  • डेंग्यू
  • व्हायरल हिपॅटायटिस
  • कोविड-19

कोणत्या परिस्थितीत लगेच डॉक्टरांकडे जावं?

  • लक्षणे कायम राहणे किंवा वाढत जाणे.
  • जुलाबात रक्त येणे.
  • शरीरात पाण्याची गंभीर कमतरता (डिहायड्रेशन), तीव्र गोळे येणे किंवा लघवी कमी होणे.
  • 101°F (38.3°C) किंवा त्यापेक्षा जास्त ताप येणे किंवा शरीराचं तापमान खूप कमी होणे.
  • एका महिन्यात शरीराचं 10% पेक्षा जास्त वजन कमी होणे.
  • कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं अन्न खाल्ल्यानंतर किंवा संसर्ग जास्त प्रमाणात असलेल्या देशात/भागात प्रवास केल्यानंतर लक्षणे दिसणे.

बचावासाठी काय कराल?

  • विशेषतः माती, पाळीव प्राणी किंवा इतर जनावरांच्या संपर्कानंतर हात नीट धुवा.
  • कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं अन्न आणि मांस खाणं टाळा.
  • मांस आणि मासे पूर्णपणे शिजवूनच खा.
  • सॅलडसह सर्व भाज्या स्वच्छ धुऊनच खा.
  • कोणत्या अन्नामुळे, औषधामुळे किंवा गोष्टीमुळे त्रास होतो हे ओळखा आणि शक्यतो त्यापासून दूर राहा.

स्टूल टेस्ट का महत्त्वाची आहे?

प्रत्येक पोटाचा संसर्ग सारखा नसतो. त्यामुळे आजाराचं नेमकं कारण शोधणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे योग्य उपचार करता येतात आणि संसर्गाचा प्रसारही रोखता येतो.
यासाठी डॉक्टर खालील तपासण्या सुचवू शकतात:
  • स्टूल अॅनालिसिस (Stool Analysis)
  • स्टूल ओव्हा आणि पॅरासाइट तपासणी (Stool Ova & Parasite Examination)
  • स्टूल कल्चर (Stool Culture)
  • स्टूल मल्टिप्लेक्स PCR जसे FilmArray BioFire GI Panel
  • इमेजिंग तपासण्या – USG Abdomen, CT Abdomen, Endoscopy
  • CBC, प्रोटीन लेव्हल, व्हिटॅमिन B12, फॉलिक अॅसिड इत्यादी रक्त तपासण्या
या तपासण्यांमुळे संसर्गाचं खरं कारण समजतं, योग्य निदान करता येतं आणि वेळेत योग्य उपचार सुरू करता येतात.

Web Title: Food poisoning symptoms gastroenteritis stool test stomach infection causes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • infections
  • stomach
  • stomach health

संबंधित बातम्या

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम
1

लघवी मार्गात वारंवार संसर्ग का होतो? UTI इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, अन्यथा मूत्राशयावर होईल परिणाम

विकतचे पदार्थ खाऊन पोट बिघडते? पावसाळ्यात टायफॉइड आणि पोटाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सोपे उपाय
2

विकतचे पदार्थ खाऊन पोट बिघडते? पावसाळ्यात टायफॉइड आणि पोटाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सोपे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.