
Home Remedies for Heartburn and Acidity
Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनियमित वेळी जेवणे यामुळे पचनाचे कार्य बिघडू शकते. त्यामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून ते अन्ननलिकेत परत येऊ शकते. यामुळे जळजळ आणि आंबट ढेकर यांचा त्रास होतो. यासाठी तळलेले, मसालेदार पदार्थ कमी करण्यासोबत चहा-कॉफीचे प्रमाण देखील नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
दिवसाची सुरुवात भिजवलेल्या मुनक्यांनी करा. मनुक्यांचे सेवन केल्यास शरीराला फायबर आणि नैसर्गिक पोषक घटक मिळतात. यामुळे पचनक्रियेचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. ज्यामुळे अॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास कमी होईल.
दुपारच्या जेवणानंतर भिजवलेली बडीशेप आणि रात्रीच्या जेवणानंतर १ चमचा बडीशेप खाऊ शकता. बडीशेपचा वापर पचनासाठी केला जातो. त्यामुळे पोट फुगणे आणि पचनाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते.
ॲसिडिटी नियंत्रणासाठी आहारासोबत श्वसनाच्या व्यायामाही फायदेशीर ठरतात. आरामदायक वाटणारा प्राणायाम दुपारच्या जेवणापूर्वी १० वेळा आणि रात्रीच्या जेवणापूर्वी १० वेळा केला जाऊ शकतो.
ॲसिडिटी वारंवार होत असेल तर काही पदार्थांचे सेवन टाळणे महत्त्वाचे आहे. तिखट, तेलकट, जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ शक्य तितके कमी करा. चहा, कॉफी, कार्बोनेटेड पेये आणि अतिप्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन टाळा. एकाच वेळी भरपूर जेवण्याऐवजी कमी प्रमाणात आणि वेळेवर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा. तसेच, रात्री झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी जेवम करा. याशिवाय, धूम्रपान आणि मद्यपानही शक्य तितके टाळा. जेवणानंतर सुमारे १० मिनिटे चालणेही पचनासाठी फायदेशीर ठरु शकते. जर ॲसिडिटीचा त्रास जास्त होत असेल तर स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.