Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe: लहान मुलांसाठी घरीच तयार करा हेल्दी आणि टेस्टी रवा पिझ्झा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

चवीला पौष्टिकतेची जोड! खाण्याचा बाबतीत बोलणे केले तर लहान मुलांची पहिली पसंती पिझ्झा असते. मात्र यात वापरला जाणारा मैदा आरोग्यासाठी घातक ठरत असतो. अशावेळी तुम्ही घरीच रव्याचा पिझ्झा तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 14, 2024 | 08:15 PM
Recipe: लहान मुलांसाठी घरीच तयार करा हेल्दी आणि टेस्टी रवा पिझ्झा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Recipe: लहान मुलांसाठी घरीच तयार करा हेल्दी आणि टेस्टी रवा पिझ्झा, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Follow Us
Follow Us:

पिझ्झा हा एक असा फास्ट फूडचा प्रकार आहे, जो लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. हा एक पाश्चात्य खाद्यपदार्थ आहे. लहान मुलांना तर पिझ्झाचे भारीच वेड! काही खास प्रसंगी अथवा बाहेर फिरायला गेले की बहुतेक लोक पिझ्झा ऑर्डर करतात. मात्र पिझ्झा हा आरोग्यासाठी तितकासा चांगला नाही. यात वापरण्यात आलेल्या मैद्यामुळे तो आरोग्यासाठी घातक ठरत असतो.

अनेकदा लहान मुलं घरच अन्न सोडून पिझ्झा खाण्याचा हट्ट धरतात. अशावेळी काय करावे ते सुचत नाही. बऱ्याचदा लहान मुलांच्या हट्टासमोर मोठ्यांना माघार घ्यावी लागते. मात्र अशावेळी आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही घरीच पौष्टिक असा पिझ्झा तयार करू शकता. हा पिझ्झा चवीला तर चांगला असेलच शिवाय आरोग्यासाठीही हा फायद्याचा ठरेल. हा पिझ्झा आपण रव्यापासून तयार करणार आहोत. मुख्य म्हणजे, रव्यापासून तयार केलेला हा पिझ्झा चवीला मात्र तितकाच अप्रतिम लागतो. शिवाय हा पिझ्झा तयार करणं देखील फार सोपं आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • रवा – 1 कप
  • दही – 1/4 कप
  • मीठ – चवीनुसार
  • फ्रूट साल्ट- 1/4 टीस्पून
  • तेल – वंगण करण्यासाठी
  • टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस – आवश्यकतेनुसार
  • पनीर – किसलेले
  • तुमच्या आवडीचे टॉपिंग्ज (जसे की कांदे, भोपळी मिरची, मशरूम, ऑलिव्ह इ.)
  • ओरेगॅनो, लाल मिरची, इतर हर्ब्स आणि मसाले – चवीनुसार
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • रव्याचा पिझ्झा तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व प्रथम एका भांड्यात रवा, दही, मीठ आणि फ्रूट सॉल्ट घालून मिक्स करा. थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. लक्षात ठेवा की द्रावण खूप पातळ नसावे
  • यानंतर नॉन-स्टिक पॅन गरम करून थोडे तेल लावा. तव्यावर पीठ पसरून त्याला गोल आकार द्या
    तवा झाकून मध्यम आचेवर 2-3 मिनिटे शिजवा
  • नंतर झाकण काढून वर थोडे तेल लावून पुन्हा झाकून ठेवा आणि 2-3 मिनिटे शिजवा
  • बेस शिजला की त्यावर टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस पसरवा
  • मग यावर किसलेले चीज, कांदा, सिमला मिरची, मशरूम इ.
  • तुमच्याकडे ओव्हन असल्यास, बेसवर टॉपिंग्ज लावल्यानंतर, पिझ्झा 180 डिग्री सेल्सिअसवर 10-12 मिनिटे बेक करा
  • नंतर फक्त पिझ्झा गरमागरम सर्व्ह करा
  • तुम्ही त्यात चिली फ्लेक्स किंवा इतर सॉस देखील घालू शकता
  • अशाप्रकारे तुमचा रवा पिझ्झा अगदी झटपट बनून तयार होईल
  • तयार पिझ्झा तुम्ही तुमच्या आवडत्या डीपसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Homemade semolina pizza a tasty and healthy option for kids know the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 08:15 PM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
1

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’
2

Malpua Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी तयार करा गोड आणि मऊ ‘मालपुआ’

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
3

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश
4

Recipe : जेवणाचा बेत खास करायचा विचार आहे? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईस ‘पनीर टिक्का मसाला’, चव चाखूनच मन होईल खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.