Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस ‘पचं डाळ’, रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

Panch Dal Recipe : ही पारंपरिक राजस्थानी पंच डाळ राजस्थानी जेवणाचा अस्सल स्वाद आपल्या स्वयंपाकघरात आणते. हिवाळ्याच्या थंड वातावरणात पाच डाळींपासून बनवलेली ही पंच डाळ आरोग्याला अनेक फायदे मिळवून देते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 08, 2026 | 09:38 AM
हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस 'पचं डाळ', रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

हिवाळ्यात शरीर बनवा तंदुरुस्त, दुपारच्या जेवणात बनवा राजस्थानची फेमस 'पचं डाळ', रेसिपी जी आईच्या जेवणाची आठवण करून देईल

Follow Us
Follow Us:
  • राजस्थानच्या चवीला आता तुमच्या स्वयंपाकघरात आणा.
  • पाच डाळींपासून बनवली जाणारी ही पचंडाळ आहेत फार पौष्टिक.
  • हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात गरमा गरम भातासोबत पचंडाळ फार चवदार लागते.
राजस्थानमधील पारंपरिक जेवणामध्ये डाळींना खूप विशेष स्थान आहे. वाळवंटी प्रदेश असल्यामुळे इथे भाज्या मर्यादित प्रमाणात उपलब्ध असतात, म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा वापर करून चविष्ट, पौष्टिक आणि टिकाऊ पदार्थ तयार केले जातात. त्यापैकीच एक प्रसिद्ध रेसिपी म्हणजे राजस्थानी पंच डाळ. पंच डाळ म्हणजे पाच वेगवेगळ्या डाळींचे एकत्रित मिश्रण. या डाळी योग्य प्रमाणात एकत्र शिजवल्या जातात आणि त्यावर पारंपरिक राजस्थानी मसाल्यांची फोडणी दिली जाते. या डाळीला लसूण, जिरे, लाल तिखट, हिंग आणि तूप यांची खास चव लाभते.

काही चटपटीत खायचंय? मग घरी बनवा अमृतसरी ‘स्टफ्ड छोले कुलचे’, चटपटीत चव पंजाबचा फील आणेल

पंच डाळ ही केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे, कारण यात प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. गरमागरम बाजरीची भाकरी, गव्हाची पोळी किंवा साजूक तुपात भिजवलेला भात यांच्यासोबत राजस्थानी पंच डाळ खाल्ली की जेवणाची खरी मजा येते. सणासुदीच्या जेवणात किंवा खास पाहुण्यांसाठी ही रेसिपी हमखास केली जाते. आता पाहूया ही अस्सल राजस्थानी पंच डाळ घरीच कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • तूर डाळ – 2 टेबलस्पून
  • चणा डाळ – 2 टेबलस्पून
  • मूग डाळ – 2 टेबलस्पून
  • मसूर डाळ – 2 टेबलस्पून
  • उडीद डाळ (साल काढलेली) – 2 टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
फोडणीसाठी:
  • तूप – 2 टेबलस्पून
  • जिरे – 1 टीस्पून
  • लसूण (ठेचलेला) – 1 टेबलस्पून
  • सुक्या लाल मिरच्या – 2
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
दिवसाची सुरुवात करा चमचमीत पदार्थाने! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा मटार- पनीर सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम सर्व पाचही डाळी स्वच्छ धुवून 30–40 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • भिजवलेल्या डाळी कुकरमध्ये घालून त्यात हळद, मीठ आणि पाणी घाला.
  • 3–4 शिट्ट्या देऊन डाळी मऊ शिजवून घ्या.
  • कढईत तूप गरम करा आणि त्यात जिरे घाला.
  • जिरे तडतडले की त्यात लसूण आणि सुक्या लाल मिरच्या घाला.
  • लसूण हलका गुलाबी झाला की लाल तिखट आणि हिंग घाला.
  • ही फोडणी लगेच शिजलेल्या डाळीवर ओता आणि चांगले मिसळा.
  • गरज असल्यास थोडे पाणी घालून उकळी येऊ द्या.
  • वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
  • अधिक अस्सल चव हवी असल्यास फोडणीसाठी तूपच वापरा.
  • ही डाळ दुसऱ्या दिवशी आणखी चविष्ट लागते.

Web Title: Know how to make rajasthan style panch dal at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • easy food recipes
  • lifestyle news
  • marathi recipe

संबंधित बातम्या

World Brain Day 2026: तणाव, स्क्रीनचा वाढता वापर आणि बैठी जीवनशैलीच्या युगात मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण
1

World Brain Day 2026: तणाव, स्क्रीनचा वाढता वापर आणि बैठी जीवनशैलीच्या युगात मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
2

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
3

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

Health : भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटाला मिळणार संरक्षण
4

Health : भारतात डेंग्यूवरील पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटाला मिळणार संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.