Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवीबरोबच आरोग्याचीही काळजी! अशाप्रकारे घरी बनवा Masala Oats; चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

Masala Oats Recipe: पौष्टिक पण तितकेच चविष्ट असे काही बनवण्याचा विचार करत असाल मसाला ओट्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याची चव इतकी चमचमीत लागते की तुम्ही बोट चाटायला कमी करणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 18, 2025 | 10:55 AM
चवीबरोबच आरोग्याचीही काळजी! अशाप्रकारे घरी बनवा Masala Oats; चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

चवीबरोबच आरोग्याचीही काळजी! अशाप्रकारे घरी बनवा Masala Oats; चव अशी की सर्वजण बोटं चाटत राहतील

Follow Us
Follow Us:

सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकजण बाहेरचे फास्ट फूड खाण्यावर अधिक भर देतात, ज्यामुळे कमी काळातच त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अधिकतर लोक डाएटिंगचा आधार घेतात. आता हेल्दी खायचं म्हटलं की, ओट्स या पदार्थाचे नाव सर्वात पहिले मनात येते. मात्र अनेकांना याची चव फारशी आवडत नाही. अशात आम्ही तुमच्यासाठी मसाला ओट्सची एक टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत. याची चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही पुन्हा पुन्हा याचा आस्वाद घ्याल

.मसाला ओट्स हा एक नाश्ता आहे जो केवळ स्वादिष्टच नाही तर पोषक देखील आहे. ओट्समध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे तुमची पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. हे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

व्हेज खाद्यप्रेमींसाठी खास! घरी ट्राय करा झणझणीत कोबी खिमा रेसिपी, लगेच नोट करा साहित्य आणि कृती

साहित्य

  • 1 कप ओट्स
  • 1/2 कप पाणी
  • 1/4 कप दूध (किंवा नारळाचे दूध)
  • 1/2 टीस्पून हळद पावडर
  • 1/2 टीस्पून धने पावडर
  • 1/4 टीस्पून लाल तिखट
  • 1/4 टीस्पून गरम मसाला
  • आले, किसलेले
  • 1/4 टीस्पून जिरे
  • 1 कांदा, बारीक चिरलेला
  • 1 टोमॅटो, बारीक चिरून
  • 1/2  कप वाटाणे
  • 1/2 कप गाजर किसलेले
  • 1 हिरवी मिरची, बारीक चिरून
  • चवीनुसार मीठ
  • ताजी कोथिंबीर, बारीक चिरून (गार्निशसाठी)
थंडीत केळीच्या चिप्समुळे चहाची मजा होईल द्विगुणित, 15 मिनिटांत तयार होते रेसिपी

कृती

  • मसाला ओट्स बनवण्यासाठी प्रथम एका नॉन-स्टिक पॅनमध्ये जिरे टाका आणि तडतडू द्या. नंतर त्यात कांदा आणि हिरवी मिरची घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या
  • यानंतर यात टोमॅटो, गाजर आणि मटार घालून काही मिनिटे शिजवून घ्या
  • त्यात हळद, धने पावडर, तिखट, गरम मसाला, मीठ आणि आले घालून मिक्स करा
  • आता त्यात ओट्स घालून मिक्स करा
  • मग यात गरजेनुसार पाणी आणि दूध घालून सर्व साहित्य नीट एकजीव करा
  • पॅनवर झाकण ठेवून मध्यम आचेवर काही मिनिटे ओट्स मऊ होईपर्यंत शिजवा
  • शेवटी गॅस बंद करून त्यात चिरलेली कोथिंबीर घालून गरमा गरम मसाला ओट्स खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Know how to make tasty masala oats easy recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • healthy recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
1

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
2

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय!  झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा
3

Chana Dal Palak Chilla: चवही भारी, पौष्टिकही! नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय! झटपट बनवा चणा डाळ-पालक चीला; रेसिपी नोट करा

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी
4

Zunka Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा झणझणीत गावराण स्टाईल झुणका, चव अशी की तोंडाला येईल पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.