महाशिवरात्रीला (Mahashivratri 2022) अनेक भाविक उपवास करतात. उपवासासाठी(Fasting Food) तुम्हाला वेगळा पदार्थ ट्राय करायचा असेल तर एकदा रताळ्याचे कटलेट (Sweet Potato Cutlet) तयार करुन बघा. रताळी शरीरासाठी फार पौष्टिक असतात. रताळी आणि राजगिरामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दिवसभर तुम्हाला ताजेतवाणे वाटू शकते. (Healthy Food For Mahashivratri)
[read_also content=”महाशिवरात्रीचा उपवास करताय? रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नका फळे, आयुर्वेदाचे ‘हे’ नियम ठेवा लक्षात https://www.navarashtra.com/food/food/easy-tips-to-eat-fruits-with-th-help-of-ayurvedic-remedies-nrak-246619.html”]
[read_also content=”भगवान शंकराची तब्बल ३०० वर्षांहून अधिक जुनी मूर्ती व शिवलिंग येथे विराजमान तर, अनेक जटिल आजारांवर उपयुक्त तलावाचे पाणी ही येथील विशेषतः https://www.navarashtra.com/mahashivaratri/religion/mahashivaratri/the-300-year-old-idol-of-lord-shiva-and-the-shivling-are-enshrined-here-nraa-246796.html”]
साहित्य- एक ते दोन रताळी, राजगिऱ्याच्या लाह्या, मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, तूप
कृती- रताळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये उकडून घ्या. रताळ्याचा गर काढून त्यात राजगिऱ्यांच्या लाह्या, मिरचीचा ठेचा चवीपुरते मीठ टाका आणि या मिश्रणाचे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्या. कटलेट पॅनवर शॅलो फ्राय करा आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खा.