Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Friendship Day Gift Ideas 2026: 1000 रुपयाच्या बजेटमध्ये आपल्या जीवलग मित्राला गिफ्ट करा काही खास… 5 हटके आयडियाज

Gift Ideas : आयुष्यात खरे मित्र फार कमी लोकांना मिळतात. तुमच्याही आयुष्यात तुम्हाला चांगला, खरा आणि जीवलग मित्र लाभला असेल तर त्याला मैत्रीदिनानिमित्त त्याला एक गिफ्ट देणं तर बनतचं. बजेट फ्रेंडली गिफ्टची यादी पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 01, 2026 | 11:36 AM
Friendship Day Gift Ideas 2026: 1000 रुपयाच्या बजेटमध्ये आपल्या जीवलग मित्राला गिफ्ट करा काही खास... 5 हटके आयडियाज

Friendship Day Gift Ideas 2026: 1000 रुपयाच्या बजेटमध्ये आपल्या जीवलग मित्राला गिफ्ट करा काही खास... 5 हटके आयडियाज

Follow Us
Follow Us:
  • फ्रेंडशिप डेनिमित्त कमी बजेटमध्येही मित्राला आनंद देणाऱ्या अनेक अर्थपूर्ण आणि उपयोगी भेटवस्तूंचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • वैयक्तिक आठवणी जपणाऱ्या तसेच दैनंदिन वापरात येणाऱ्या गिफ्ट्सना आजकाल अधिक पसंती दिली जाते.
  • मित्राच्या आवडी, व्यक्तिमत्त्व आणि छंद लक्षात घेऊन निवडलेली भेट मैत्री अधिक खास बनवू शकते.
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशीप डे म्हणजेच मैत्री दिवस साजरा केला जातो. हा एक असा दिवस आहे जो मैत्रीच्या नात्याला समर्पित असून या दिवशी मित्रांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. आपल्याला आई-वडिल, भाऊ-बहिण हे नाते जन्मापासूनच आपल्यासोबत जोडले जातात पण मैत्री हे नातं आपण स्वत: आपल्या आयुष्याशी जोडून घेतो. कुणाला मित्र बनवायचं आणि कुणाला नाही हा निर्णय देखील आपलाच असतो. खरे मित्र हे कठीण काळातही मदत करायला मागे हटत नाही आणि अशा मित्रांची साथ ही आयुष्यभर आपल्यासोबत बांधून ठेवली जाते. हा दिवस त्या मित्रांचा आहे जे आपल्या आयुष्याशी जोडलेले आहेत, जे सुख-दु:खात आपल्या सोबत असतात आणि ज्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण कायमस्वरूपी आठवण बनून राहतो.

मैत्री दिनानिमित्त मित्राला फक्त शुभेच्छाच दिल्या जात नाहीत तर त्याला काही खास भेटवस्तू देखील गिफ्ट केल्या जातात. यात कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. मग तो कोणता पदार्थ असून शकतो, ग्रिटींग कार्ड असू शकते किंवा कस्टमाईझ गिफ्ट असू शकते. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये आपल्या मित्राला एक चांगली, संस्मरणात राहिल अशी वस्तू गिफ्ट करायची असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरेल.

शरीरातील विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडलं आहे? कोमट पाण्यात मिक्स करून प्या ‘ही’ हिरवी पावडर, बद्धकोष्ठता- अपचनचा त्रास होईल कमी

Personalized Mug

जर तुमचं बजेट २५० ते ५०० रुपयांच्या आत असेल तर एक पर्सनलाइज्ड मग तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतं. यावर तुम्ही तुमचा आणि तुमच्या मित्राचा खास फोटो प्रिंट करुन घेऊ शकता. या काॅफी मगचा दररोज वापर करताना मित्राला फोटो पाहताना तुमची नेहमी आठवण येईल.

Photo Frame

असं म्हणतात की, आठवणी या फोटोज सामावून ठेवल्या जातात. बजेट जर ३०० ते ८०० पर्यंतचे असेल तर एक सुंदर फोटो फ्रेम गिफ्ट करणं उत्तम पर्याय ठरेल. मित्रासोबतच्या सर्व चांगल्या आठवणी तुम्ही या फोटोफ्रेममध्ये कैद करुन ठेवू शकता.

Indoor Plant

घराचे साैंदर्य वाढवण्यासाठी किंवा घराला एक आकर्षित लूक देण्यासाठी इंडोर प्लांट्सचा वापर केला जातो. यामुळे घराच्या सुंदरतेत वाढ होते. तुमचा मित्र नेचर लव्हर असल्याल त्याला हे गिफ्ट नक्कीच फार आवडेल. हे प्लांट्स साधारण ३०० ते ७०० रुपयांत खरेदी करता येतात.

Scented Candle Gift Set

घराचे वातावरण चांगले करण्यासाठी आणि सुगंध दरवळत ठेवण्यासाठी खास प्रसंगी सुगंधित कँडल लावली जाते. हे एक बजेट फ्रेंडली गिफ्ट आहे जे तुमच्या मित्राला नक्कीच आवडेल. याची किंमत ३०० ते ६०० रुपयांपर्यंत जाते.

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार

Chocolate Hamper

जर तुमच्या मित्राला चाॅकलेट खायला फार आवडत असेल, तो चाॅकलेटप्रेमी असेल तर विविध चाॅकलेट्सने भरलेले हँपर किंवा चाॅकलेटचा बाॅक्स गिफ्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. ५०० ते १००० रुपयांपर्यंत उत्तम दर्जाचे चाॅकलेट्स खरेदी करता येतात.

Web Title: Friendship day 2026 budget friendly gift ideas for best friend under 1000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • Friendship Day
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
2

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
4

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.