Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Friendship Day 2026: काय आहे फ्रेंडशिप डे चा इतिहास, जाणून घ्या मैत्री दिन साजरा करण्यामागील कारण

'फ्रेंडशिप डे' संपूर्ण जगात सर्वत्र रविवार, 2 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी मित्र मैत्रिणी एकमेंकांना शुभेच्छा देतात, बँड्स आणि भेटवस्तू देऊन मैत्री दिन साजरा करतात. 'फ्रेंडशिप डे' चा इतिहास काय आहे? तो साजरा करण्यामागील कारणे जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 01, 2026 | 01:02 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • फ्रेंडशिप डे ची सुरुवात कशी झाली
  • फ्रेंडशिप डेचा काय आहे इतिहास
  • फ्रेंडशिप बॅंड बांधण्याची काय आहे परंपरा
 

 

मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि निस्वार्थ नाते मानले जाते. कुटुंबानंतर जीवनात खंबीर साथ देणारे मित्र अनेक सुख-दुःखाचे साक्षीदार असतात. या अमूल्य नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिन) साजरा केला जातो. यावेळी फ्रेंडशिप डे रविवार, 2 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी मित्रांप्रती प्रेम, विश्वास आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. मात्र, हा दिवस नेमका कसा सुरू झाला आणि त्यामागचा इतिहास काय आहे, हे अनेकांना माहिती नसते.

फ्रेंडशिप डेची सुरुवात कशी झाली

मैत्री दिनाची संकल्पना सर्वप्रथम १९३० मध्ये अमेरिकन हॉलमार्क कार्ड्स किंवा ग्रीटिंग कार्ड कंपनीचे संस्थापक जॉयस सी. हॉल यांनी मांडली. मित्रांना शुभेच्छा देऊन मैत्रीचा सन्मान करण्यासाठी एक विशेष दिवस असावा, अशी त्यांची कल्पना होती. सुरुवातीला हा दिवस व्यावसायिक उपक्रम म्हणून पाहिला गेला. मात्र, कालांतराने लोकांनी त्यामागील भावनिक मूल्य स्वीकारले आणि मैत्रीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला.

Friendship Day Gift Ideas 2026: 1000 रुपयाच्या बजेटमध्ये आपल्या जीवलग मित्राला गिफ्ट करा काही खास… 5 हटके आयडियाज

फ्रेंडशिप डेचे महत्त्व

विश्वास, सहकार्य, प्रामाणिकपणा आणि परस्पर आदर यांवर मैत्री आधारित असते. फ्रेंडशिप डे हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून, आयुष्यात साथ देणाऱ्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे. हा दिवस आपल्याला नात्यांची जपणूक करण्याची, जुने गैरसमज दूर करण्याची आणि मैत्री अधिक दृढ करण्याची प्रेरणा देतो.

फ्रेंडशिप डेचा इतिहास

अमेरिकेत हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉएस हॉल यांनी मैत्रीचा दिवस असावा अशी सुंदर संकल्पना १९३० साली मांडली. त्यानंतर १९३५ ला अमेरिकन सरकारने ऑगस्टचा पहिला रविवार हा मित्रांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. इतिहासातील हा सुवर्ण दिवसच ठरला. त्यानंतर १९५८ पराग्वे देशात डॉ. रेमन आर्तफिओ ब्राचो यांनी २० जुलै १९५८ रोजी जागतिक पातळीवर ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. २०११ साली मात्र याला जागतिक दर्जा मिळाला.. संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा दिवस अधिकृतरीत्या आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केले. पण भारत आणि इतर अनेक देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम आहे. हल्ली डिजिटल युगामुळे फ्रेंडशिप डे अधिक लोकप्रिय झाला आहे. या दिवशी खास करून तरुणाईला अधिक असते. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मित्रांना शुभेच्छा, फोटो, व्हिडिओ आणि आठवणी शेअर करून हा दिवस साजरा केला जातो. काही ठिकाणी मोठं मोठ्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.

Business Ideas : तुमचे मित्रच बनतील बिझनेस पार्टनर! एकत्र येऊन सुरु करा ‘हे’ व्यवसाय, कमी भांडवलमध्ये बंपर नफा

फ्रेंडशिप बॅंड बांधण्याची काय आहे परंपरा

1990 च्या दशकात फ्रेंडशिप बँडची प्रथा विशेष लोकप्रिय झाली. रंगीबेरंगी बँड मित्राच्या हातावर बांधून कायमची मैत्री आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. आजही ही परंपरा विशेषतः शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळते.

या पाश्चिमात्य सणाची लोकप्रियता भारतात अधिक वाढत असली तरी, भारतासारख्या देशात याला धार्मिक कोंदण देऊन काही सामाजिक संस्था पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम साधून यांचे महत्त्व वाढवत असतात. त्यामुळे भारतातही हा दिवस अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. पण याचबरोबर काही ठिकाणी तरुणाई चंगळवादही करत असतात. यापासून दूर राहून हा दिवस साजरा केला. तर नक्कीच हा दिवस आणखी शुभ होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जातो?

    Ans: भारतात फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

  • Que: फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो?

    Ans: मित्रांप्रती प्रेम, विश्वास, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

  • Que: फ्रेंडशिप डेच्या दिवशी लोक काय करतात?

    Ans: या दिवशी मित्र एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधतात, शुभेच्छा देतात, भेटवस्तू देतात आणि एकत्र वेळ घालवतात

Web Title: Friendship day 2026 what is the reason behind celebrating the history of friendship day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Friendship Day
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
1

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
2

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
4

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.