Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले ‘पान मोदक’

Pan Modak Recipe : बाप्पाच्या आवडीच्या मोदकांना द्या हटके ट्विस्ट, घरी बनवा स्वादिष्ट चवीने भरलेले पान मोदक. हे मोदक चवीला अप्रतीम लागतात आणि झटपट तयारही होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 24, 2025 | 09:51 AM
Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले 'पान मोदक'

Ganesh Chaturthi 2025 : हटक्या पदार्थाने करा बाप्पाला खुश; यंदा प्रसादासाठी बनवा सुगंधित आणि गोड चवीने भरलेले 'पान मोदक'

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र आनंद, उत्साह आणि बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होते. या पवित्र दिवसांत बाप्पाला आवडणारा “मोदक” हा नैवेद्य विशेष महत्त्वाचा मानला जातो. नेहमीसारखे उकडीचे किंवा तळलेले मोदक आपण वारंवार करतो, पण आज आपण थोडं वेगळं आणि खास काही करणार आहोत ते म्हणजे पान मोदक.

पावसाळा संपण्याआधी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम पालक-कॉर्न सूप, सर्दीपासून मिळेल सुटका

पान हे भारतीय संस्कृतीत आदराचे, सणासुदीचे आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. पारंपरिक काळापासून पानाचा उपयोग फक्त खाण्यासाठी नव्हे, तर देवपूजेतही केला जातो. पानामध्ये असणारा गोडसर, ताजेतवानेपणा आणि अनोखा सुगंध मोदकाच्या गोडव्याला एक वेगळंच रुप देतो. पान आणि गुळ-नारळ यांचा संगम झाल्यावर तयार होणारे हे पान मोदक बाप्पालाही आवडतील आणि पाहुण्यांनाही. ही रेसिपी सोपी, झटपट आणि खूपच स्वादिष्ट आहे. चला तर मग गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी खास पान मोदकांची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • पान (बेताचे किंवा गोड पान) – ५ ते ६
  • किसलेला नारळ – १ कप
  • गूळ – ¾ कप
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • तूप – १ टेबलस्पून
  • खसखस – १ टीस्पून (ऐच्छिक)
  • सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता बारीक चिरलेले) – २ टेबलस्पून
  • मोदकाचा साचा

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत चिरोट्यांची रेसिपी

कृती:

  • पान स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्या. नंतर मिक्सरमध्ये पान बारीक वाटून हिरवी पेस्ट तयार करा.
  • कढईत तूप गरम करून त्यात खसखस आणि चिरलेला सुकामेवा हलक्या आचेवर भाजून घ्या.त्याच कढईत किसलेला नारळ घालून थोडा वेळ परतवा.
  • नंतर गूळ घालून चांगले मिश्रण तयार करा. गुळ वितळून घट्ट होईपर्यंत शिजवा.गुळ-नारळाचे मिश्रण तयार झाल्यावर त्यात वेलची पूड घालून एकजीव करा. हे पुरण थंड होऊ द्या.
  • थंड झालेल्या पुरणात पानाची पेस्ट मिसळून छान एकसंध मिश्रण करा.मोदकाच्या साच्याला हलके तूप लावा.
  • त्यात तयार केलेले पान-नारळ-गुळ मिश्रण भरा आणि मोदकाचा आकार द्या.सर्व मोदक तयार करून ताटात मांडून घ्या.
  • इच्छेनुसार त्यावर थोडे ड्रायफ्रूट्स सजवू शकता. हे पान मोदक बाप्पाला नैवेद्याला अर्पण करा आणि नंतर कुटुंबासोबत आस्वाद घ्या.
  • पान मोदक फक्त पानाच्या पान मोदक फक्त पानाच्या पेस्टसह करून त्यात दूध पावडर किंवा मावा मिसळूनही बनवता येतात.
  • हवं असल्यास गुलकंद घालून स्वाद दुप्पट करू शकता.
  • हे मोदक जास्त टिकत नाहीत, म्हणून ताजे ताजे खाणे उत्तम.

FAQs (संबंधित प्रश्न)

गणेश चतुर्थी २०२५ कधी आहे?
बुधवार, २७ ऑगस्ट.

पान मोदक किती दिवस साठवून ठेवू शकतो?
तुम्ही फ्रिजमध्ये हे मोदक आठवडाभर साठवून ठेवू शकता.

Web Title: Ganesh chaturthi 2025 delicious refreshing pan modak recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • marathi recipe
  • modak news

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाची ‘ही’ आहेत 32 रुपे, त्याच्या प्रत्येक रुपामागे दडले आहे चमत्कारी रहस्य
1

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाची ‘ही’ आहेत 32 रुपे, त्याच्या प्रत्येक रुपामागे दडले आहे चमत्कारी रहस्य

भारतातील एकमेव मंदिर जिथे विराजमान आहेत विना सोंडेचे गणपती; पत्राद्वारे पूर्ण होते भक्तांची इच्छा
2

भारतातील एकमेव मंदिर जिथे विराजमान आहेत विना सोंडेचे गणपती; पत्राद्वारे पूर्ण होते भक्तांची इच्छा

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी या राशीच्या लोकांना मिळेल धन, यश आणि शांती
3

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी या राशीच्या लोकांना मिळेल धन, यश आणि शांती

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा
4

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.