Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : उपमा उरलाय तर फेकायचा कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

Upma Cutlet Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवला जाणारा उपमा जास्तीचा उरलाय? मग चिंता सोडा आणि यापासून घरी बनवा कुरकुरीत उपम्याचे कटलेट. हे कटलेट चवीला फार स्वादिष्ट लागतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 04, 2026 | 09:54 AM
Recipe : उपमा उरलाय तर फेकायला कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत 'कटलेट'

Recipe : उपमा उरलाय तर फेकायला कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत 'कटलेट'

Follow Us
Close
Follow Us:
  • अनेक भारतीय घरांमध्ये तयार होणारा उपमा हा सामान्य नाश्ता आहे.
  • बऱ्याचदा उपमा जास्तीचा बनला की त्या उरलेल्या उपम्याला फेकून दिले जाते.
  • अशावेळी तुम्ही या उरलेल्या उपम्यापासून कुरकुरीत असे कटलेट तयार करु शकता.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला झटपट आणि पोटभर नाश्ता हवा असतो. म्हणूनच रव्याचा उपमा हा अनेक घरांचा कायमस्वरूपी भाग बनलेला आहे. फोडणीचा सुगंध, त्यात घातलेल्या भाज्यांची चव आणि हलकासा तिखटपणा यामुळे उपमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. मात्र अनेकदा सकाळी केलेला उपमा थोडा शिल्लक राहतो. दुसऱ्या दिवशी तो कोरडा आणि घट्ट झालेला दिसला की तो खाण्याची इच्छा होत नाही आणि तो फेकून दिला जातो.

Holi 2026 : सणाचा आनंद करा द्विगुणित, घरी बनवा चटकदार चवीची ‘पाणी फुलकी’, अजून खाली नाही? तर आता ट्राय करा

पण थोडीशी कल्पकता वापरली तर हाच शिल्लक उपमा एकदम वेगळ्या आणि आकर्षक रूपात सादर करता येतो. उरलेल्या अन्नाचा योग्य वापर करणे ही केवळ बचतीची सवय नाही, तर ती अन्नाबद्दलची कृतज्ञताही आहे. शिल्लक उपम्याचे कटलेट बनवणे हा त्याचाच उत्तम नमुना आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, चवदार असे हे कटलेट संध्याकाळच्या चहाबरोबर, मुलांच्या डब्यासाठी किंवा पाहुण्यांसाठी झटपट स्नॅक म्हणूनही उत्तम पर्याय ठरतात. चला तर मग पाहूया ही सोपी आणि चविष्ट रेसिपी.

साहित्य

  • 2 वाट्या शिल्लक उपमा
  • 1 उकडलेला बटाटा (कुस्करलेला)
  • 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ किंवा ब्रेडक्रम्स
  • शॅलो फ्राय करण्यासाठी तेल
प्रोटीनने भरलेली चटपटीत चवीची ‘पीनट चाट’ तुम्ही कधी खाल्ली आहे का? रेसिपी नोट करा

कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात शिल्लक उपमा घ्या. तो खूप कोरडा असेल तर हाताने हलका मोकळा करून घ्या.
    त्यात कुस्करलेला उकडलेला बटाटा घाला.
  • बटाटा मिश्रणाला बांधून ठेवण्याचे काम करतो. दोन्ही घटक नीट एकजीव होईपर्यंत मळून घ्या.
  • मिश्रण सैल वाटत असल्यास तांदळाचे पीठ किंवा ब्रेडक्रम्स घालून ते घट्ट करा.
  • तयार मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करून हाताने किंवा साच्याच्या मदतीने कटलेटचा आकार द्या.
  • तव्यावर थोडे तेल गरम करा. मध्यम आचेवर तयार कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार कटलेट टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या.
  • गरमागरम कटलेट टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा दह्याच्या डिपसोबत सर्व्ह करा. हवे असल्यास मिश्रणात थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची किंवा किसलेले गाजर घालून चव आणखी वाढवू शकता.
 

Web Title: How to make crispy cutlets from leftover upma recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा ‘लाल मिरचीचा ठेचा’
1

Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा ‘लाल मिरचीचा ठेचा’

Summer Special : आइसक्रीमला द्या ब्रेक, उन्हाळ्यात थंडगार लिंबाच्या चवीसह घरी बनवा ‘लेमन सॉर्बेट’, रेसिपी नोट करा
2

Summer Special : आइसक्रीमला द्या ब्रेक, उन्हाळ्यात थंडगार लिंबाच्या चवीसह घरी बनवा ‘लेमन सॉर्बेट’, रेसिपी नोट करा

मैद्याचा वापर न करता लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा Vegetable Paneer Pizza , नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
3

मैद्याचा वापर न करता लहान मुलांसाठी नाश्त्यात बनवा Vegetable Paneer Pizza , नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश… तुम्ही कधी ‘मन गण’ खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी
4

सणासुदीला बनवली जाणारी गोव्याची खास स्वीट डिश… तुम्ही कधी ‘मन गण’ खाल्ला आहे का? आजच नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.