Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला प्रिय असलेली गोड तेलपोळी कशी तयार कराल? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

गणेश चतुर्थीला खास नैवेद्य म्हणून केली जाणारी तेलपोळी ही पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड पोळी आहे. गूळ, तीळ व तुपाच्या स्वादाने परिपूर्ण ही पोळी खायला मऊसर व सुगंधी लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2025 | 08:27 AM
Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला प्रिय असलेली गोड तेलपोळी कशी तयार कराल? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला प्रिय असलेली गोड तेलपोळी कशी तयार कराल? पारंपरिक रेसिपी जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

गणेश चतुर्थी म्हटली की घराघरात विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ केले जातात. मोदक, पुरणपोळी, लाडू, करंजी यांसोबतच तेलपोळी हा देखील एक खास महाराष्ट्रीयन पारंपरिक गोड पदार्थ आहे. तेलपोळीला “गुळपोळी” असेही म्हणतात. ही पोळी विशेषतः सण, उत्सव व श्रावण-भाद्रपदातील धार्मिक विधींमध्ये केली जाते. तुपकट व गुळाचा अप्रतिम स्वाद असलेली ही पोळी खायला मऊ, सुगंधी व पौष्टिक असते.

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत केळीची भजी, कधीच विसरणार नाहीत पदार्थाची चव

गुळामुळे शरीराला उर्जा मिळते आणि तूपामुळे पचन सुधारते. गणपती बाप्पाला गोड पदार्थ खूप प्रिय असल्यामुळे अनेक घरांमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी नक्कीच तेलपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाचा नैवेद्य आणखीन खास बनवायचा असेल तर तेलपोळीचा प्रसाद घरी बनवायलाच हवा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • गव्हाचे पीठ – २ कप
  • मैदा – ½ कप (ऑप्शनल, पोळी मऊ होण्यासाठी)
  • गूळ – १ कप (किसून)
  • तीळ – ३-४ मोठे चमचे
  • तूप – ३-४ मोठे चमचे
  • वेलची पूड – ½ चमचा
  • जायफळ पूड – ¼ चमचा
  • तेल – २ चमचे
  • मीठ – चिमूटभर
  • पाणी – आवश्यकतेनुसार
चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स,नोट करा रेसिपी

कृती

  • गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व तेल एकत्र करून पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. हे पीठ झाकून किमान ३० मिनिटे बाजूला ठेवा.
  • कढईत तीळ भाजून घ्या आणि थंड झाल्यावर वाटून घ्या.
  • एका कढईत किसलेला गूळ घ्या. त्यात थोडे तूप टाकून मंद आचेवर वितळू द्या.
  • गुळ वितळल्यावर त्यात भाजलेला तीळ, वेलची पूड व जायफळ पूड टाका. नीट एकत्र करून मिश्रण गार होऊ द्या.
  • पीठाचे छोटे गोळे व पुरणाचे छोटे गोळे बनवा.
  • पीठाचा गोळा घेऊन त्यात पुरण भरून पोळी लाटून घ्या.
  • तव्यावर पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजा. भाजताना थोडे तूप लावले तर चव अधिक वाढते.
  • गुळ वितळताना त्यात थोडे दूध घातल्यास पुरण मऊसर होते.
  • पुरण खूप ओले होऊ देऊ नये, नाहीतर पोळी लाटताना फुटेल.
  • ही पोळी तुपाबरोबर खाल्ल्यास अप्रतिम लागते.
  • तेलपोळी हा गोड पदार्थ केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी देखील आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी गणपती
  • बाप्पाला तेलपोळीचा नैवेद्य अर्पण केल्याने भक्तीभाव वाढतो आणि घरात आनंदमय वातावरण निर्माण होते.

Web Title: Ganesh chaturthi 2025 how to make authentic tel poli at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 08:26 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Ganesh Chaturthi 2026
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप
1

Lalbaugcha Raja Visarjan: ढोल-ताशांचा गजर अन् भक्तांचा सागर; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप
4

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.