चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स
नूडल्चे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला चटकदार लागणारे नूडल्स लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या भाज्या, सॉस टाकून बनवलेले नूडल्स चवीला अतिशय सुंदर लागतात. कोणत्याही वेळी तुम्ही नूडल्स बनवून खाऊ शकता. संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही नूडल्स बनवू शकता. लहान मुलांना कायमच चायनीज खाण्याची इच्छा होते. विकत मिळणाऱ्या चायनीजमध्ये हाजीनोमोटोचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्यामुळे पोट लवकर भरते. सतत बाहेरील विकतचे पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिली गार्लिक नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचा चिला, शरीरातील हाडे राहतील मजबूत