Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 : जाण्याआधी बाप्पाला खुश करा, नैवेद्यात खाऊ घाला काजूचे मोदक; फार सोपी आहे रेसिपी

Cashew Modak : बाप्पाच्या विसर्जनाची तारीख जवळ आली आहे अशात बाप्पा पुन्हा आपल्या घरी जाण्याआधी एकदा घरी नक्की बनवा काजूचे मोदक. हे मोदक चवीला तर अप्रतिम लागतात शिवाय झटपट तयारही होतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 05, 2025 | 10:02 AM
Ganesh Chaturthi 2025 : जाण्याआधी बाप्पाला खुश करा, नैवेद्यात खाऊ घाला काजूचे मोदक; फार सोपी आहे रेसिपी

Ganesh Chaturthi 2025 : जाण्याआधी बाप्पाला खुश करा, नैवेद्यात खाऊ घाला काजूचे मोदक; फार सोपी आहे रेसिपी

Follow Us
Follow Us:

गणेश चतुर्थी हा आनंद, भक्ती आणि उत्साहाचा सोहळा आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला श्रीगणेशाचे आगमन होते आणि दहा दिवस घराघरात बाप्पाची पूजा, आराधना व विविध नैवेद्यांचा प्रसाद दाखवला जातो. या दिवसांत बाप्पासाठी मोदकाला विशेष महत्त्व आहे. मोदक हा गणरायाचा आवडता नैवेद्य मानला जातो, ज्यामुळे गणेशोत्सवात मोदक बाप्पाला आवर्जून अर्पण केला जातो.

१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी, नोट करून घ्या रेसिपी

पारंपरिक उकडीचे मोदक, तळलेले मोदक यांच्यासोबतच आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे फ्युजन मोदकही केले जातात. त्यातला एक विशेष प्रकार म्हणजे काजू मोदक. हा मोदक श्रीगणेशाला अर्पण करायला अगदी योग्य असा स्वादिष्ट आणि पौष्टिक प्रसाद आहे. काजूपासून तयार झालेल्या या मोदकाला अप्रतिम चव, सुंदर आकार आणि सणासुदीचा खास टच मिळतो. बाप्पाचे विसर्जन जवळ आले आहे अशात बाप्पा पुन्हा आपल्या घरी परतण्याआधीच त्याला खाऊ घाला चविष्ट काजूचे मोदक. याची रेसिपी फार सोपी आहे जी कमी वेळेत बनून तयार होते. चला तर मग जाणून घेऊया काजू मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • १ कप काजू
  • ¾ कप साखर
  • ¼ कप पाणी
  • १ चमचा तूप
  • ½ टीस्पून वेलची पूड
  • मोदकाच्या साच्यासाठी थोडं तूप
साधा, सोपा अन् पारंपरिक… घरी बनवा आगरी कोळी स्टाईल नारळी भात! गणेशाच्या नैवेद्यात एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम काजू स्वच्छ करून कोरडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पण जाडसर पूड तयार करा.
  • काजू जास्त वेळ वाटू नका, नाहीतर तेल सुटेल.
  • कढईत साखर आणि पाणी घालून एक तार पाक तयार करा. पाक जाडसर होईपर्यंत सतत हलवत राहा.
  • पाकात काजूची पूड घालून चांगले मिसळा. गॅस मंद ठेवा आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत हालवत रहा.
  • मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात वेलची पूड आणि थोडंसं तूप घालून नीट हलवा.
  • हे मिश्रण थोडं गार होऊ द्या. पण पूर्ण थंड होऊ देऊ नका, नाहीतर मोदकाचे आकार येणार नाहीत.
  • मोदक साचा तुपाने हलका चोपडून घ्या. मिश्रण साच्यात भरून नीट दाबा व मोदक तयार करा.
  • तयार झालेले सुंदर व स्वादिष्ट काजू मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करा.
  • मिश्रण जास्त शिजवू नका, नाहीतर कडक होईल.
  • इच्छेनुसार केशर किंवा गुलाब एस्सेन्स घालून मोदकाला खास चव व सुगंध आणता येतो.
  • हा काजू मोदक सणासुदीला पटकन बनतो आणि श्रीगणेशाला अर्पण करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

काजू मोदक साठवता येतात का?
होय, तुम्ही हे हवाबंद डब्यात एका मोकळ्या किंवा थंड ठिकाणी साठवून ठेवू शकता.

काजू मोदक कधी बनवले जातात?
अधिकतरवेळी हे मोदक गणेशोत्सवातच बनवले जातात.

Web Title: Ganesh chaturthi 2025 make tasty and easy kaju modak at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • marathi recipe
  • modak news

संबंधित बातम्या

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?
1

Mumbai cha Raja : बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीतच आलं विघ्न, म्हणून ‘मुंबईचा राजा’चं शुक्रवारी विसर्जन नाही?

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू
2

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या विसर्जनसाठी घरी तयार करा ‘केसर मलाई मोदक’, ही आहे हलवाई स्टाईल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.