Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा ‘केसरी खीर’, या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

Kesari Kheer Recipe : महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा होणारा सण म्हणजे वसंत पंचमी. या दिवशी देवी सरस्वती मातेची पूजा करून तिला केसरी खीर अर्पित केली जाते. चला या खिरीची पारंपारिक रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 23, 2026 | 09:32 AM
Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा 'केसरी खीर', या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

Vasant Panchami 2026 : वसंत पंचमीनिमित्त देवी सरस्वतीला अर्पण करा 'केसरी खीर', या दिवशी पदार्थाला आहे विशेष महत्त्व

Follow Us
Follow Us:
  • देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवानिमित्त वसंत पंचमीचा सण साजरा केला जातो.
  • या दिवशी देवीची पूजा केली जाते आणि तिला प्रसाद अर्पण केला जातो.
  • या प्रसादात तुम्ही केसरी खीर तयार करू शकता.
वसंत पंचमी हा सण म्हणजे निसर्गाच्या नव्या सुरुवातीचा, आनंदाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. हिवाळ्याची थंडी कमी होऊन वातावरणात गोडवा आणि प्रसन्नता येऊ लागते. या दिवशी विद्या, कला आणि ज्ञानाची देवी माँ सरस्वती यांची पूजा केली जाते. पिवळा रंग हा वसंत पंचमीचा मुख्य रंग मानला जातो, जो समृद्धी, उत्साह आणि शुभतेचे प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवण्याची परंपरा आहे.

विकतचा कशाला? घरीच बनवा मऊ, जाळीदार बेसनाचा ‘ढोकळा’, रेसिपी आहे फार सोपी

केशरी खीर ही वसंत पंचमीसाठी खास बनवली जाणारी पारंपरिक गोड डिश आहे. केशरामुळे खिरीला सुंदर पिवळसर रंग, सुगंध आणि राजेशाही चव मिळते. दूध, तांदूळ, साखर आणि सुकामेवा यांच्या संगमातून तयार होणारी ही खीर प्रसाद म्हणून अर्पण केली जाते. ही खीर केवळ चवीलाच अप्रतिम नसून मनाला समाधान देणारी आणि सणाचा गोडपणा वाढवणारी आहे. चला तर मग, वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर घरच्या घरी केशरी खीर कशी बनवायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य:

  • फुल क्रीम दूध – १ लिटर
  • बासमती तांदूळ – ¼ कप
  • साखर – ½ कप (चवीनुसार)
  • केशर – १०–१२ काड्या
  • कोमट दूध – २ टेबलस्पून (केशर भिजवण्यासाठी)
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • बदाम – २ टेबलस्पून (कापलेले)
  • काजू – २ टेबलस्पून (तुकडे केलेले)
  • मनुका – १ टेबलस्पून
  • तूप – १ टीस्पून
थेंबभर तेलाचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट टोमॅटो सूप, १० मिनिटांत तयार होईल सकाळचा नाश्ता

कृती

  • यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
  • जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळायला ठेवा. दूध उकळल्यानंतर गॅस मंद करा.
  • भिजवलेले तांदूळ दूधात घालून सतत ढवळत शिजवा. तांदूळ मऊ आणि खीर घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
  • दुसऱ्या भांड्यात तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि मनुका हलकेसे परतून घ्या.
  • खिरीत साखर घालून नीट मिसळा. साखर घातल्यानंतर खीर थोडी पातळ होते, त्यामुळे ५–७ मिनिटे आणखी शिजवा.
  • भिजवलेले केशर, वेलची पूड आणि परतलेला सुकामेवा खिरीत घाला.
  • सर्व साहित्य नीट मिसळून २–३ मिनिटे उकळू द्या आणि गॅस बंद करा.
  • तयार खीर गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: Vasant panchami 2026 make tasty and sweet kesari kheer recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.