(फोटो सौजन्य: Pinterest
भात हा एक असा पदार्थ आहे जो कसाही बनवला तरी चवीला चविष्टच लागतो. समुद्रकिनारी राहणाऱ्या आगरी-कोळी समाजाच्या जेवणात मासे, तांदूळ आणि नारळ हे त्रिसूत्री घटक कायमचे दिसतात. समुद्राच्या लाटांसारखे मनमोकळे जीवन जगणारे हे लोक साधे, झटपट पण चविष्ट पदार्थ बनवतात. त्यात नारळी भाताला एक विशेष मान मिळतो. नारळी भात चवीला साधा पण चविष्ट असा लागतो. बाप्पाचे आगमन झाले आहे अशात गणपतीच्या नैवेद्यात तुम्ही नारळी भाताचा समावेश करू शकता.
गणेश उत्सवात बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवा बेसन हलवा, झटपट तयार होईल पदार्थ
सण-उत्सव, श्रावण-भाद्रपदातील नारळी पौर्णिमा किंवा खास पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी हा भात बनवला जातो. साध्या तांदळात किसलेला गोडसर नारळ, साजूक तूप, सुगंधी मसाले हे सर्व मिळून नारळी भात अप्रतिम लागतो. गोडसर आणि मसालेदार अशी आगरी-कोळी पद्धती ही खासियत आहे. हा भात चवदार असून पोटभरीचा आहे. सणासुदीच्या वातावरणात कुटुंबीय एकत्र बसून गरमागरम नारळी भाताचा आस्वाद घेण्यात वेगळेच सुख आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
कृती :
नारळी भात म्हणजे काय?
नारळी भात हा ताज खोबरं आणि तांदूळ वापरून बनवलेला एक भाताचा पदार्थ आहे, हा चवीला साधा पण चविष्ट असा लागतो.
नारळी भात कोणत्या सणांना बनवतात?
हा भात विशेषतः नारळी पौर्णिमा किंवा श्रावण पौर्णिमा या सणांच्या वेळी बनवला जातो.