१५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी
मुंबईतील स्ट्रीट फूड खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पाणीपुरी, मसाला पाव, पाव भाजी इत्यादी अनेक पदार्थ मुंबईच्या स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणात विकले जातात. वेगवेगळ्या भागांमध्ये फेमस असलेले स्ट्रीट फूड खाण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी असते. अमृतसरमधील प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे पनीर भुर्जी. हा पदार्थ तिथे पावासोबत अतिशय आवडीने खाल्ला जातो. याशिवाय चपाती किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही पनीर बुर्जी खाऊ शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. कायमच पनीरची भाजी किंवा पनीर बिर्याणी इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण नेहमी नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया अमृतसर स्पेशल पनीर भुर्जी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)