
कमीत कमी वेळात तयार होणारे गुलकंद मोदक
गणपती बाप्पाला मोदक आवडतात, असे मानले जाते. बाप्पाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ठेवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे मोदक म्हणजे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो पण हेच मोदक चवीला खूप सुंदर लागतात. मोदक बनवताना अनेकांच्या काळ्या तुटतात. तसेच तुम्ही उकडीच्या मोदकांसोबतच पुरणाचे मोदक, माव्याचे मोदक, साखरेचे मोदक, केशर मोदक इत्यादी अनेक प्रकारचे मोदक तुम्ही बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुलकंदाचे मोदक कसे बनवायचे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गुलकंदमध्ये मधाचा गोडवा असल्यामुळे चवीला गुलकंद खूप छान लागते. गुलकंद खाल्ल्याने आरोग्याला सुद्धा फायदे होतात. काहींना गुलकंद दुधातून खायला आवडतो तर काहींना नुसताच गुलकंद खायला आवडतो. कमीत कमी वेळात तयार होणारे गुलकंद मोदक नक्की बनवून पहा.
हे देखील वाचा: बाप्पाच्या प्रसादासाठी १० मिनिटांमध्ये अशा पद्धतीने बनवा सुंठवडा, चवीला लागेल सुंदर