१० मिनिटांमध्ये अशा पद्धतीने बनवा सुंठवडा
७ सप्टेंबर ला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर बाप्पाची मनोभावे पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाचे स्वागत झाल्यानंतर 10 दिवस सगळीकडे वेगळीचे वातावरण असते. घरी बाप्पा येणार म्हणून अनेक अनेक गोड पदार्थ बनवले जातात. बाप्पाच्या नैवेद्यासाठी वेगळे पदार्थ, आरती झाल्यानंतर प्रसादासाठी वेगळे पदार्थ असे अनेक पदार्थ या दिवसांमध्ये घरी बनवले जातात. बाप्पाच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ मोदक आहे. पण बाप्पाला मोदकांशिवाय इतरही पदार्थ खायला खूप आवडतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे सुंठवडा. सुंठवडा चवीसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी सुंठवडा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्हीसुद्धा नक्की सुंठवडा बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)






