
पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग या सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
Ganeshotsav 2026: गौरी गणपतीच्या सणाला किंवा घरातील इतर कार्यक्रमांच्या दिवशी पंचामृत आवडीने बनवले जाते. आंबट तिखट चवीचे पंचामृत नैवेद्याच्या ताटात आवर्जून वाढले जाते. पण बऱ्याचदा पंचामृत बनवताना चव पूर्णपणे बिघडून जाते. पंचामृत कधी खूप जास्त आंबट होते तर कधी खूप जास्त गोड होऊन जाते. त्यामुळे योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीचा वापर करून पंचामृत बनवायचे असेल तर या टिप्स नक्कीच फॉलो करा. यामुळे पदार्थाची चव सुद्धा वाढेल. चिंच गूळ केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी आहे. त्यामुळे इतर वेळी जेवणाची चव वाढवण्यासाठी तुम्ही पंचामृत बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंबट तिखट पंचामृत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)