Ukdiche Modak Recipe : गणेशोत्सवात आवर्जून तयार केला जाणारा पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. तुम्हालाही घरी परफेक्ट रुचकर असे उकडीचे मोदक तयार करायचे असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
लवकरच बाप्पाचे आगमन होणार नाही.
मोदक हा गणपतीचा आवडीचा पदार्थ.
चला उकडीच्या मोदकांची रेसिपी जाणून घेऊया.
गणेशोत्सव म्हटलं की घराघरात बाप्पाच्या आवडीचा मोदक आवर्जून केला जातो. त्यातही तांदळाच्या पिठाची मऊसूत उकड आणि गुळ-खोबऱ्याचा सुगंधी सारण असलेले उकडीचे मोदक हे महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ मानला जातो. उकडीचे मोदक बनवताना उकड योग्य प्रकारे मळणे आणि मोदकाची पाकळी पातळ करणे या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. योग्य प्रमाणात पाणी घेऊन उकड तयार केली आणि ती गरम असतानाच व्यवस्थित मळली, तर मोदकाची पारी सहज तयार होते. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने मऊ, स्वादिष्ट आणि सुंदर उकडीचे मोदक कसे बनवायचे याची सोपी रेसिपीजाणून घेऊया.
कढईत तूप गरम करून त्यात किसलेले खोबरे आणि गूळ घाला. मंद आचेवर मिश्रण ढवळत राहा. गूळ वितळून मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यात वेलची आणि जायफळ पूड घाला. सारण जास्त वेळ शिजवू नका, अन्यथा ते कोरडे होऊ शकते.
एका भांड्यात एक कप पाणी घ्या. त्यात तूप आणि मीठ घालून पाणी उकळू द्या. पाण्याला चांगली उकळी आली की गॅस मंद करा.
उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ एकदम घालून लगेच झाकण ठेवा. साधारण एक ते दोन मिनिटे झाकण ठेवून पीठ वाफवून घ्या. त्यानंतर चमच्याने मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
उकड थोडी गरम असतानाच हाताला पाणी किंवा तूप लावून ती मऊसर मळून घ्या. उकडीत गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. उकड जितकी मऊ आणि लवचिक असेल, तितकी मोदकाची पारी चांगली तयार होते.
उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याला हाताच्या तळव्यावर गोलसर पसरवा. बोटांच्या मदतीने पारी शक्य तितकी पातळ करा. पारीच्या कडेवर बारीक घड्या पाडत मध्यभागी सारण भरा.
सारण भरल्यानंतर पारीच्या सर्व घड्या एकत्र आणून मोदकाचे टोक बंद करा. मोदकाचा पारंपरिक शिखराचा आकार व्यवस्थित द्या. सर्व मोदक याच पद्धतीने तयार करून घ्या.
मोदकपात्रात किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करा. चाळणीला किंवा मोदकाच्या पानाला थोडे तूप लावून त्यावर मोदक ठेवा. साधारण १० ते १५ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. मोदकाची उकड थोडी पारदर्शक आणि चमकदार दिसू लागली की मोदक तयार आहेत.