Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा ‘हे’ १ लहान काम

गॅस सिलेंडर लवकर संपत असल्याने घरातील बजेटवरही त्याचा परिणाम होतो. मात्र स्वयंपाक करताना काही छोट्या सवयी बदलल्यास गॅसचा अनावश्यक वापर कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2026 | 08:15 PM
आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा 'हे' १ लहान काम

आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा 'हे' १ लहान काम

Follow Us
Follow Us:
  • स्वयंपाक करताना भांड्यावर झाकण ठेवल्याने उष्णता टिकून राहण्यास मदत होते.
  • बर्नर नियमित स्वच्छ ठेवा आणि गरज नसताना हाय फ्लेमचा वापर टाळा.
  • गॅसची गळती किंवा कनेक्शनमधील समस्या असल्यास स्वतः दुरुस्ती न करता प्रशिक्षित तंत्रज्ञाची मदत घ्या.
गॅस सिलेंडर हे घरातील सर्वात महत्त्वपूर्ण सामानांपैकी एक आहे. आधुनिक काळातील चूल म्हणजे गॅस सिलेंडर. घरात रोजचे जेवण तयार करण्यासाठी सिलेंडरची नितांत गरज असते. आजकाल जवळपास सर्वांच्याच घरी गॅस सिलेंडरचे कनेक्शन पाहायला मिळते. पण सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे त्याचा वापर अनेकांना परवडणारा ठरत नाही. असंख्य पदार्थांची मेजवाणी किंवा सततच्या वापरामुळे गॅस सिलेंडर महिनाभराआधीच संपतो आणि गृहीणींना प्रश्न पडतो की, याला जास्तीत जास्त कसे वापरावे. साधारणत: एक गॅस सिलेंडर महिनाभर टिकतो पण काही खास ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर तुम्ही महिनाभराहून अधिक काळ गॅस सिलेंडर चालवू शकता. आता हे कसे करायचे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

जेवण बनवताना भांड्यावर झाकण ठेवा

जेवण बनवताना कधीही भांड्यावर किंवा कढईवर झाकण ठेवण्याची सवय लावावी. भांडे झाकल्याने उष्णता बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते आणि भाजी लवकर शिजते. यामुळे एकूणच गॅसचा वापर कमी होतो. तुम्ही भात शिजवत असाल किंवा भाजी शिजवत असाल कोणताही पदार्थ तयार करताना त्यावर झाकण ठेवायला विसरु नका. यामुळे महिनाभरात गॅस सिलेंडरची बरीच बचत होईल.

बर्नर क्लिन करा

घाणेरडा किंवा चोक झालेल्या बर्नरमुळे गॅसचा वापर वाढू शकतो. जर बर्नरच्या व्हेंट्समध्ये तेल, मसाले किंवा अन्नाचे कण असतील तर कापडाने ही घाण बाहेर काढून चांगली पुसून घ्या. वेळोवेळी बर्नरला साफ करत रहा. सामान्यपणे फ्लेम निळी आणि स्थिर दिसत असेल तर सर्वकाही ठिक आहे पण या पॅटर्नमध्ये काही बदल दिसून येत असेल तर बर्नरची तपासणी करुन घ्या.

हाय फ्लेमचा वापर टाळा

अनेकांना असं वाटतं की, हाय फ्लेमवर जेवण शिजवल्याने जेवण पटकन तयार होते आणि गॅसची बचत होते. पण खरंतर तस नाही आहे, भाजी, डाळ किंवा भात शिजवताना नेहमी गरजेनुसार गॅसची फ्लेम मंद किंवा मध्यम ठेवावी. जिथे गरज असेल फक्त तिथेच हाय फ्लेमचा वापर करा.

Aloe Vera Benefits: कोरफड लावताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान, जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

गॅस लिकेजकडे दुर्लक्ष करु नका

जर गॅस सिलेंडर पूर्वीहून जलद गतीने संपत असेल तर यासाठी नेहमी तुमच्या कुकिंग स्किल्स जबाबदार ठरत नाही. गॅस पाईप, रेग्युलेटर किंवा कनेक्शन्समधील गळती हे देखील यामागचे कारण ठरु शकते. पाईपमध्ये छिद्र दिसत असेल, पाईप तुटला असेल किंवा सैल कनेक्शन्स आढळल्यास स्वत: त्याची दुरुस्ती न करता प्रशिक्षित तंत्रज्ञाकडून त्याची तपासणी करा आणि काही समस्या असल्यास ती ठिक करुन घ्या. यासोबतच वापर झाल्यानंतर गॅस सिलेंडरचे स्विच बंद करायला विसरु नका,

Web Title: Gas cylinder last longer save lpg gas cooking tips burner flame leakage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • lifestyle news
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
1

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
2

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलिंडर महागला! ‘या’ शहरात सर्वाधिक दरवाढ
3

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या तोंडावर गॅस सिलिंडर महागला! ‘या’ शहरात सर्वाधिक दरवाढ

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
4

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.