Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gastroparesis Awareness Month: ॲसिडिटी किंवा अपचन समजून ५०% महिला आणि मधुमेही गॅस्ट्रोपेरेसिसकडे करताय दुर्लक्ष

गॅस्ट्रोपेरेसिस म्हणजे नक्की काय आणि याकडे कशा पद्धतीने दुर्लक्ष होत आहे. याबाबत अधिक जागरूता निर्माण करणे गरजेचे आहे आणि यासाठीच हा महिना साजरा करण्यात येत आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 21, 2025 | 10:02 PM
गॅस्ट्रोपेरेसिस म्हणजे नेमके काय (फोटो सौजन्य - iStock)

गॅस्ट्रोपेरेसिस म्हणजे नेमके काय (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • गॅस्ट्रोपेरेसिस जागरूकता महिना म्हणून ऑगस्ट पाळतात
  • गॅस्ट्रोपेरेसिस म्हणजे नेमके काय 
  • गॅस्ट्रोपेरेसिस कारणे, लक्षणे आणि उपाय

ऑगस्ट महिना हा गॅस्ट्रोपेरेसिस जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. गॅस्ट्रोपेरेसिसविषयी बहुतांश व्यक्तींना पुरेशी माहिती नसल्याने या विकाराबद्दल जागरूकता वाढवणे ही काळाची आहे. गॅस्ट्रोपेरेसिस हा एक आजार असून यात अन्नाचे पचन नीट होत नाही किंवा जेवल्यानंतर पोट व्यवस्थितरित्या रिकामं होत नाही आणि पोटाची हालचाल मंदावते. गॅस्ट्रोपेरेसिस किंवा पोट उशिरा रिकामे होणे, सतत पोटफुगी, मळमळ, लवकर पोट भरणे आणि पौष्टिक घटकांची कमतरता हे जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम करतात. 

ॲसिडीटी किंवा अपचन समजून बऱ्याचदा गॅस्ट्रोपेरेसिसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते, विशेषतः महिलावर्ग आणि मधुमेहींकजून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येते. ही स्थिती समजून घेणे आणि त्यावर वेळीच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे. या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

गॅस्ट्रोपेरेसिस म्हणजे नक्की काय?

 पोटाचे स्नायू योग्यरित्या कार्य करत नसल्यामुळे, लहान आतड्यातील अन्नाची हालचाल मंदावते किंवा थांबवते तेव्हा गॅस्ट्रोपेरेसिस होतो. पोट रिकामे होण्यास वेळ लागणे आणि हा विलंब एखाद्याच्या पचनक्रियेत अडथळा निर्माण करतो, अस्वस्थता आणतो आणि कुपोषण तसेच रक्तातील साखरेची पातळी अस्थिर होण्यास कारणीभूत ठरू शकतो. 

पोटात वारंवार गॅस होतो? जाणून घ्या या मागील प्रमुख कारण आणि घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम

काय आहेत कारणे?

अनियंत्रित मधुमेह, व्हॅगस नर्व्हवर परिणाम करणाऱ्या शस्त्रक्रिया आणि काही ठराविक औषधे ही त्यामागची कारणे. मळमळ आणि उलट्या, पोटदुखी, वजन कमी होणे, थोडेसे अन्न खाल्ल्यानेही पोट भरल्यासारखे वाटणे आणि भूक न लागणे ही लक्षणे दिसून येतात. बरेच लोक या लक्षणांना पचनाच्या समस्या समजून त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, ज्यामुळे निदान आणि व्यवस्थापनात विलंब होतो.

काय आहे तज्ज्ञांचे मत 

अपोलो स्पेक्ट्रा पुणे येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे डॉ. विशाल शेठ म्हणाले की, महिला आणि मधुमेहींमध्ये गॅस्ट्रोपेरेसिसचे ५०% प्रकरणांचे वर्षानुवर्षे निदान होत नाहीत कारण त्यांची लक्षणे अ‍ॅसिडिटी किंवा गॅस सारख्या पचनाच्या तक्रारींशी जुळतात. महिला आणि मधुमेही रुग्णांमध्ये याचे निदान आव्हानात्मक आहे,  हार्मोनल बदल किंवा साखरेचे योग्य नियंत्रण न झाल्यास ही स्थिती आणखी गंभीर ठरु शकते. याकरिता जागरूकता महत्त्वाची असून वेळीच निदानाने दीर्घकालीन गुंतागुंत टाळता येऊ शकते.

मधुमेहाशी काय आहे संबंध?

डॉ. शेठ पुढे म्हणाले की, मधुमेह आणि गॅस्ट्रोपेरेसिस यांच्यात एक परस्परसंबंध आहे. उच्च रक्तातील साखरेची पातळी पोटाच्या स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांना नुकसान पोहोचवते, ज्यामुळे पोट रिकामे होण्यास उशीर होतो. दुर्दैवाने, गॅस्ट्रोपेरेसिसमुळे मधुमेहाचे व्यवस्थापन करणे कठीण होते आणि रक्तातील अनियंत्रित साखर आतड्यांचे कार्य बिघडवते. रक्तातील ग्लुकोजचे योग्य व्यवस्थापन हे आतड्यांचे आरोग्य राखण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे.

पोटात वारंवार वेदना किंवा गॅस होत असेल चुकूनही करू नका दुर्लक्ष! शरीरात वाढू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका

गॅस्ट्रोपेरेसिसवरील उपाय?

गॅस्ट्रोपेरेसिसवर कायमस्वरूपी उपचार नाही, परंतु आहारातील बदल, औषधे आणि रक्तातील साखरेवर योग्य नियंत्रणाने लक्षणे व्यवस्थापित केली जाऊ शकतात. एकाच वेळी भरपेट न जेवता थोड्या थोड्या अंतराने खाणे, जास्त चरबीयुक्त आणि जास्त फायबरयुक्त पदार्थांचे सेवन टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधांचे सेवन करा. 

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, वेळीच चाचण्या करून रक्तातील ग्लुकोजचे व्यवस्थापन हे गॅस्ट्रोपेरेसिसची लक्षणे कमी करतात आणि यामुळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. रक्तातील साखरेची नियमित तपासणी केल्यास तुम्ही निरोगी जीवन जगू शकतात आणि गॅस्ट्रोपेरेसिसचे व्यवस्थापन करू शकता.

Web Title: Gastroparesis awareness month 50 percent women and diabetic patients ignoring

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 10:02 PM

Topics:  

  • health care news
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

हाडांना हळूहळू ठिसूळ बनवतात हे 5 पदार्थ; निरोगी हाडांसाठी आजपासूनच त्यांना करा आहारातून बेदखल
1

हाडांना हळूहळू ठिसूळ बनवतात हे 5 पदार्थ; निरोगी हाडांसाठी आजपासूनच त्यांना करा आहारातून बेदखल

‘बोलू-चालू शकत नाही, पण ते चॅम्पियन..’, विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; भावाने दिली माहिती..
2

‘बोलू-चालू शकत नाही, पण ते चॅम्पियन..’, विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; भावाने दिली माहिती..

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप
3

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे
4

दिल्लीत दर 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती Diabetes ग्रस्त, का वाढतोय आजार; काय आहेत कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.