पोटात वारंवार गॅस होतो? जाणून घ्या या मागील प्रमुख कारण आणि घरगुती उपाय
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप,मानसिक ताण, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे नियमित स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात बऱ्याचदा दिसून येणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात सतत जंक फूड किंवा तिखट तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय पोटात वाढलेला गॅस, अपचन, ऍसिडिटी किंवा पोटासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. या समस्या वाढू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतात, मात्र पुन्हा एकदा पोटात गॅस तयार होतात.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. विषारी घटक साचून राहिल्यामुळे सतत गॅस होणे, उलट्या, अपचन किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. पोटात गॅस साचून राहिल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. यामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटात वारंवार गॅस तयार होण्याची नेमकी काय कारणे आहेत आणि यावर कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास पोटातील गॅसपासून तात्काळ आराम मिळेल.
पोटात गॅस झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात शेंगदाणे, कोबी, ब्रोकोली, दुग्धजन्य आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्यास पोटात गॅस वाढू लागतो. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे पोटात गॅस युक्त वायू तयार होतात. तसेच लैक्टोज आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आतड्यांमध्ये गॅस तयार करतात. त्यामुळे रोजच्या आहारात पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे, या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. आहारामध्ये कार्बोनेटेड पेये आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे.
सकाळ,दुपार, संध्याकाळच्या आहारात अन्नपदार्थांचे सेवन हळू करावे. मात्र अनेक लोक घाईगडबडीमध्ये पटापट अन्नपदार्थांचे सेवन करतात, ज्यामुळे पोटाच्या आरोग्याला हानी पोहचते. पटापट अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळेअन्न व्यवस्थित चावले जात नाही, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे हळूहळू अन्नपदार्थ चावून खावेत. महत्वाचे म्हणजे जेवण करताना कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करावा.
पित्ताशयात वाढतील खड्डे! रोजच्या आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरात सतत वाढेल पित्त
चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे इरिटेबल बोवेल सिंड्रोम, लॅक्टोज असहिष्णुता आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे आतड्यांमध्ये गॅस तयार होतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जर वारंवार अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवत असेल तर आहारात दह्याचे सेवन करावे. याशिवाय गॅस कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यावा. यामुळे गॅस कमी होतो.