
चेहऱ्यावर येईल काचेसारखी चमक! ५ रुपयांच्या 'या' पदार्थांनी करा चेहऱ्यावर काळे डाग होतील दूर
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, मानसिक तणाव, आहारात सतत होणारे बदल आणि वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मोठे फोड, डाग आणि ऍक्ने येण्याची जास्त शक्यता असते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा आणि वेगवेगळ्या सिरमचा वापर करतात. पण काहीवेळा चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा खूप जास्त डल आणि निस्तेज दिसते. महागडे फेशिअल्स, केमिकल पील्स आणि स्किन ब्राइटनिंग इत्यादी महागड्या ट्रीटमेंट करून चेहऱ्यावर ग्लो आणला जातो. पण वारंवार केलेल्या केमिकल ट्रीटमेंट त्वचेचे गंभीर नुकसान करतात.(फोटो सौजन्य – istock)
नाक आणि ओठांच्यामध्ये असलेल्या अवयवाला काय म्हणतात? याचा नेमका उपयोग काय ?
त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेण्याऐवजी स्वयंपाक घरातील नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा खूप जास्त सुंदर आणि तेजस्वी दिसते. पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय करावेत. नैसर्गिक आणि केमिकल फ्री ट्रीटमेंट त्वचेसाठी केल्यास त्वचा खूप सुंदर आणि ग्लोइंग दिसते. घरगुती उपाय त्वचेला आतून पोषण देतात आणि नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ५ रुपयांचा हा पदार्थ वापरून त्वचेवर नैसर्गिक चमक कशी आणवी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती उपाय आठवडाभर नियमित केल्यास चेहऱ्यावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील.
स्किन ब्राइटनिंग क्रीम बनवण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या साध्या आणि स्वस्त वस्तूंचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात ग्लिसरीन, कोरफड जेल आणि लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करा. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर घरगुती ‘बॉडी ऑईल’ तयार होईल. हे तेल नियमित संपूर्ण शरीराला लावल्यास काही दिवसांमध्ये परिणाम दिसून येतील. तेलाच्या वापरामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल. त्यामुळे त्वचेवर तेल योग्य पद्धतीने लावावे.
तयार केलेले बॉडी ऑइल त्वचेवर लवण्यासाठी चार ते पाच थेंब हातांवर घेऊन संपूर्ण शरीरावर लावून घ्या. त्यानंतर शरीरावर हलक्या हाताने मसाज करा. खोबरेल तेल आणि ग्लिसरीनचे एकत्र मिश्रण त्वचेला भरपूर पोषण देते. याशिवाय कोरफड जेलमध्ये असलेले घटक त्वचा आतून हायड्रेट करते. लिंबाच्या रसात नैसर्गिक ‘ब्लीचिंग’ गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, ऍक्ने, पिगमेंटेशन आणि उन्हामुळे वाढलेले टॅनिंग कमी होते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी खोबरेल तेलात ग्लिसरीन मिक्स करून लावावे.