आपल्या चेहऱ्यावर नाक आणि ओठांच्यामध्ये एक रेषेसारखा अवयव असतो जो सहसा पटकन लक्षात येत नाही, याला ओष्ट अटनी असं म्हणतात. वैज्ञानिक भाषेत याला फिल्ट्रम असं म्हणतात. फिल्ट्रम हा शब्द मूळचा ग्रीक आहे. या शब्दाचा अर्थ असा की, प्रेमाची खूण किंवा प्रेमाची जादू असा आहे. हा अवयव तसं पाहायला गेलं तर गर्भ विकसित होत असतानाच तयार होत असतो. यामुळे आपल्या सौंदर्यात भर देखील पडते. त्यामुळे अनेक अभिनेत्री सुंदर दिसायचं असेल तर, अष्ट ओटनीटी सर्जरी देखील सर्जरी करतात. याचं कारण असं की, अष्ट ओटनीमुळे तुमचा चेहरा आणखीनच आकर्षक होतो. नाक आणि ओठांच्यामध्ये असलेली ही खाच चेहऱ्यावर ग्लो आणते.
पण तुम्हाला माहितेय का अष्ट ओटनीचा आकार देखील हळूहळू बदलत जातो. अष्ट ओटनी फक्त तुमचं सौंदर्य खुलवत नाही तर तुमची आरोग्य स्थिती काय आहे हे देखील सांगते. जर तुमची तब्येत खराब असेल तर तुमच्या अष्ट ओटनीचा आकार देखील बदलत जातो. जर तुमची अष्ट ओटनी म्हणजे फिल्ट्रम सपाट होत असतील तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची गरज आहे.
काही मुलांच्या बाबतीत पाहायचं झालं तर, जन्मजात त्यांचे फिल्ट्रम हे सपाट असतात. याचं कारण म्हणजे, गर्भात असताना, मुलांची वाढ पुरेशी विकसित झाली नसेल तर, फिल्ट्रम सपाट दिसतात. सुंदरतेचा विचार केला असता असं लक्षात येतं की, फील्ट्रम नीट असतील तर तुमच्या सुंदरेत भर पडते आणि याच कारणासाठी अनेक सेलिब्रिटी सर्जरी करतात. तुम्हाला ही तुमच्या फील्ट्रमबाबत शंका असतील तर तुम्ही वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यायला पाहिजेत.






