नियासिनमाइड सीरमचे फायदे
महिलांप्रमाणे पुरुषांसुद्धा चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. बदलत्या ट्रेंडनुसार चालणे जरा कठीणच असले तरीसुद्धा अनेक लोक स्किन केअरमध्ये नियासिनमाइडचा वापर करत आहेत. मागील काही दिवसांपासून बाजारात विटामिन सी, नियासिनमाइड सीरम इत्यादी अनेक सीरम उपलब्ध झाले आहेत. तेलकट, कोरडी किंवा कॉम्बिनेशन, पिंपल्स आलेली त्वचा असली तरीसुद्धा सीरमचा वापर केला जात आहे.हे सीरम सर्वच त्वचेच्या लोकांसाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेला लावल्या जाणाऱ्या नियासिनमाइड सीरामचे नेमके काय फायदे होतात? नियासिनमाइड कसे वापरावे? हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
त्वचेसाठी नियासीनामाइड अतिशय प्रभावी आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी मदत करतात. तसेच यामुळे तणाव कमी होऊन चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, त्वचेच्या इतर समस्या आणि त्वचेमधील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात. रोज रात्री झोपताना नियासीनामाइड सीरम लावून झोपल्यास रात्रभर त्वचेच्या पेशींचे रक्षण होते.
नियासिनमाइड सीरमचे फायदे
हे देखील वाचा: केसगळती थांबवेल जास्वंदीचे तेल, घरीच बनवा
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल साचण्यास सुरुवात होते. तेल जमा झाल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा फोड येऊ लागतात. हे फोड किंवा पिंपल्स येऊ नये म्हणून चेहऱ्यावर नियासीनामाइड सीरम लावावे. यामुळे त्वचेसंबंधित समस्या कमी होऊन चेहरा उजळण्यास मदत होते.
उन्हातून किंवा इतर वेळी बाहेर जाताना चेहऱ्याला नियासीनामाइड सीरम लावावे. उन्हाच्या किरणांमुळे त्वचेचे होणार नुकसान टाळण्यासाठी नियमित नियासीनामाइड सीरम लावावे. हायपरपिग्मेंटेशन आणि काळे पडलेले डाग कमी करण्यासाठी नियासीनामाइड सीरम मदत करते. त्यामुळे रोजच्या वापरात नियासीनामाइड सीरमचा वापर करावा.
हे देखील वाचा: केस धुतल्यानंतर खूप गळतात? मग ‘अशा’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, वाढले केसांचे सौंदर्या
नियासिनमाइड सीरमचे फायदे
चेहऱ्याला सीरम लावण्याधी चेहरा स्वच्छ धुवून नंतर कोरड्या कपड्याने पुसून घ्या. पुसून झाल्यानंतर सीरम लावून 2 ते 3 मिनिटं थांबून नंतर इतर गोष्टी त्वचेला लावा. सकाळी आणि रात्रीच्या वेळी चेहऱ्याला नियासीनामाइड सीरम लावावे. नियासीनामाइड सीरम लावल्यानंतर सनस्क्रीन लावायला विसरू नये. तसेच लावण्याधी पॅच टेस्ट नक्की करून पहा.