
छातीत साचून राहिलेल्या कोरड्या कफापासून मिळेल कायमची सुटका! 'या' औषधी काडीचे सेवन केल्यास शरीर होईल स्वच्छ
जेष्ठमधाचे शरीराला होणारे फायदे?
थंडीत सर्दी खोकला का होतो?
बदलत्या ऋतूंमध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. गुलाबी थंडीत सगळीकडे आल्हाददायक वातावरण असते. पण अनेकांना हिवाळा ऋतू नकोस वाटतो. कारण या ऋतूमध्ये आरोग्यासंबंधित भरपूर समस्या उद्भवू लागतात. सतत सर्दी खोकला, ताप, साथीच्या आजारांची लागण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे थंडीत आरोग्याची जास्त काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे छातीत कफ साचून राहणे, कोरडा खोकला, श्वास घेण्यास अडचण, घसा खवखवणे आणि अशक्तपणा जाणवणे यांसारख्या असंख्य समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. रात्री झोपल्यानंतर येणाऱ्या कोरड्या खोकल्यामुळे सगळेच खूप हैराण होतात. सर्दी खोकला झाल्यानंतर बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार न करता मेडिकलमधील गोळ्या आणून खाल्ल्या जातात. (फोटो सौजन्य – istock)
वारंवार पेनकिलरच्या गोळ्या खाल्ल्यामुळे किडनीला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतेही चुकीचे उपचार करण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवावा. आयुर्वेदामध्ये सर्दी खोकल्यावर असंख्य औषध उपचार सांगण्यात आले आहेत. सर्दी खोकला झाल्यानंतर जेष्ठमधाचे सेवन करण्याचा सल्ला आयुर्वेदामध्ये देण्यात आला आहे. घशात अडकलेला कफ आणि दिवसभर सतवणाऱ्या सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी जेष्ठमधाचे सेवन करावे. आजीबाईच्या बटव्यातील अतिशय औषधी आणि गुणकारी पदार्थ म्हणून जेष्ठमधाची ओळख आहे. जेष्ठमधाची छोटीशी काडीसुद्ध शरीरासाठी खूप जास्त प्रभावी ठरते.
थंडीच्या दिवसांमध्ये आईस्क्रीम किंवा कोणत्याही थंड पेयांचे सेवन केल्यानंतर लगेच सर्दी खोकला होऊन घशात वेदना जाणवू लागतात. जेष्ठमध शरीरासाठी औषधाप्रमाणे प्रभावी ठरते. हिवाळ्यात छातीत जमा झालेला कोरडा कफ, सर्दी कमी करण्यासाठी जेष्ठमध खावे. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक कफ पातळ करण्यासाठी मदत करतात. याशिवाय घशाला सुद्धा आराम मिळतो. जेष्ठमध ही एक औषधी वनस्पती आहे. ज्याच्या सेवनामुळे शरीराला फायदे होतात. कोणतीही हानी होत नाही. सर्दी खोकला झाल्यांनतर प्रामुख्याने जेष्ठमध खाल्लेले जाते. यामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे घशाला आलेली सूज कमी होते.
छातीमध्ये जमा झालेला कफ पातळ करण्यासाठी जेष्ठमधाची बारीक काडी चघळून खावी. यामुळे घट्ट झालेला कफ सहज बाहेर पडून जातो. खोकल्यामुळे घशात वाढलेली खवखव दूर करण्यासाठी जेष्ठमध खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे एका रात्रीत तुमचा खोकला बरा होईल आणि आराम मिळेल. ज्येष्ठमधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे साथीच्या आजारांची शरीराला लागण होत नाही. बाजारात जेष्ठमधाचे चूर्ण सुद्धा उपलब्ध आहे.
Ans: सर्दी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो नाक, घसा आणि श्वसनमार्गाच्या सुरुवातीच्या भागावर परिणाम करतो.
Ans: शिंका येणे, नाक वाहणे (पाण्यासारखे किंवा घट्ट), नाक बंद होणे, घसा खवखवणे, खोकला.
Ans: थंड हवामानात बाहेर पडताना डोके, मान आणि हात झाकणारे उबदार कपडे घाला.