केसांच्या समस्यांपासून मिळवा कायमचा आराम!
वातावरणात होणारे बदल, आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम केस आणि त्वचेवर सुद्धा होतो. हल्ली केस गळतीच्या समस्येने सर्वच त्रस्त आहेत. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण होते. डोक्यावरील केस हळूहळू गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र सतत हानिकारक रसायनांपासून बनवलेले हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यास केसांची गुणवत्ता आणखीनच खराब होऊन जाते. केसांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम दिसून येतात. शरीरात विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर सुद्धा केस गळू लागतात. अशावेळी कोणत्याही हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – pintrest)
अंघोळीच्या अगोदर शरीरावर मीठ चोळण्याचा फायदा काय? जाणून घ्या
केसांच्या वाढीसाठी सगळ्यात प्रभावी पदार्थ म्हणजे मेथी दाणे. मेथी दाणे आरोग्यासोबतच केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. मेथी दाण्यांचे सेवन किंवा मेथीच्या दाण्यांचा वापर करून बनवलेले तेल वापरल्यास केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा. मेथीमध्ये फ्लेवेनॉइड्स आढळून येतात, ज्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. याशिवाय मेथी दाण्यांमध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी आणि अॅंटी-फंगल गुणधर्म टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते.
मेथीचे दाणे आणि दही एकत्र मिक्स करून लावल्यास केस अतिशय मजबूत होतात. यासाठी वाटीभर पाण्यात ५ चमचे मेथी दाणे भिजत घालून ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर त्यातील पाणी काढून भिजलेल्या मेथी दाण्यांची बारीक पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात चमचाभर दही घालून मिक्स करा. तयार केलेला हेअरमास्क संपूर्ण केसांवर लावून ३० मिनिट ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून केस शॅम्पूच्या सहाय्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
मेथी दाणे केसांसाठी वरदान आहेत. मेथी दाण्यांचा हेअरमास्क आठवड्यातून एकदा केसांवर लावल्यास केस अतिशय सुंदर आणि मजबूत होतील. वाटीमध्ये मेथी दाण्यांची बारीक तयार केलेली पेस्ट घेऊन त्यात कोरफड जेल घालून मिक्स करा. तयार केलेला मास्क केसांवर लावून काहीवेळ तसाच ठेवून द्या. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे केस मजबूत आणि मुलायम होतील.