कढीपत्त्याच्या पानांचे तेल केसांसाठी ठरेल वरदान!
वातावरणात सतत होणारा बदल, धूळ, माती, प्रदूषण, स्ट्रेस, आहारात होणारे बदल आणि केसांच्या वाढीसाठी केल्या जाणाऱ्या केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी किंवा केस गळती थांबणवण्यासाठी कोणत्याही केमिकल आणि हानिकारक रसायनांचा वापर करून बनवलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करू नये. हानिकारक केमिकलचा वापर केल्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे किंवा केस तुटण्याची समस्या उद्भवू लागते. हल्ली कमीत वयातच महिलांसह पुरुषांचे सुद्धा केस गळू लागतात. आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता आणि चुकीच्या हेअर प्रॉडक्ट्सचा वापर केल्यामुळे केसांसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर घरगुती पदार्थांचे वापर करून केसांची गुणवत्ता सुधारावी.(फोटो सौजन्य – pintrest)
केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर मानला जातो. कढीपत्त्याच्या पानांचा वापर करून तयार केलेले तेल केसांसाठी वरदान ठरेल. जेवणातील पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी फोडणी देताना कढीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. सकाळी उठल्यानंतर नियमित ४ किंवा ५ कढीपत्त्याची पाने चावून खाल्यास केसांच्या समस्यांसोबतच आरोग्यासंबंधित समस्या सुद्धा दूर होतील. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याचे तेल बनवण्याची कृती? कढीपत्त्याच्या तेलाचे केसांना नेमके काय फायदे होतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.
कढीपत्त्याची तेल केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरते. तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात वाटीभर खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात कढीपत्त्याची ताजी पाने टाकून उकळवून घ्यावे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेले तेल थंड झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून नियमित किंवा आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून ठेवा. यामुळे केसांना पोषण मिळेल आणि केसांच्या समस्या कमी होतील.
कढीपत्त्याचे तेल केसांना लावल्यास केसांच्या समस्या दूर होतील. यासाठी तयार केलेले कढीपत्त्याचे तेल नियमित केसांना लावावे. पण बऱ्याचदा अनेकांना असे वाटते की कढीपत्त्याचे तेल लावून केस गळणे थांबते. पण असे नाही. यासाठी आहारात सुद्धा कढीपत्याच्या पानांचे सेवन करावे. केसांना बाहेरून पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. संतुलित आहार आणि केसांची योग्य काळजी घेतल्यास महिनाभरात केसांच्या समस्या दूर होतील.
कढीपत्याच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अमिनो अॅसिड आणि बीटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणावर आढळून येते. तसेच हे तेल केसांना लावल्यानंतर केसांच्या मुळांना पोषण मिळते. केस मजबूत होतात, केसांमधील कोंडा आणि इन्फेक्शन कमी होते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कढीपत्त्याची पाने गुणकारी ठरतील.