
एक नवे लिटफेस्ट
गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने लिटरेचर लाइव्ह द मुंबई लिटफेस्टसोबत पुन्हा एकदा भागीदारी जाहीर केली आहे. या महोत्सवाचे हे १६वे पर्व आहे. येत्या ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान नरीमन पोईंट येथील एनसीपीए येथे हा कार्यक्रम पार पडेल. साहित्य आणि कलेला प्रोत्साहन देणा-या या प्रतिष्ठित महोत्सवात गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचा कायमच पाठिंबा राहिला आहे. या तीन दिवसीय कार्यक्रम साहित्यप्रेमींना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित महोत्सवात जगभरातील विचारांची, कथांची आणि दृष्टिकोनांची एक अद्भुत मेजवानी मिळेल. या महोत्सवात १०हून अधिक देशांतील १२० हून अधिक प्रतिष्ठित लेखक, वक्ते, विचारवंत आणि कलावंत सहभागी होतील. चिंतन, संवाद आणि नवीनवीन कलात्मकतेला प्रेरणा देणे, हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यात गोदरेज डीईआय लॅबचे विशेष सत्रही आयोजित केले जाईल. विविधता, समानता आणि समावेशन आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. या महोत्सवात शहराच्या उत्सवाशी सुसंगत राहून चर्चासत्रे, बुक इन फोकस, इन डोअर आणि आऊटडोअर कला सादरीकरणे, लहान मुलांसाठी लिटल फेस्टिव्हल, विविध कार्यशाळा तसेच दैनंदिन कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
मुलांसाठी उत्तम
यंदाच्या लिटफेस्टिव्हलमध्ये सुलभता विकसित होण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली गेली आहेत. अक्सेस फॉर ऑल या संस्थेच्या माध्यमातून १५ हून अधिक सत्रांमध्ये भारतीय सांकेतिक भाषा, दुभाषी उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त ओपन एअर प्लाझा मध्ये एक सेन्सरी फ्रेण्डली तंबू उभारला जाईल. हा तंबू न्यूरोडिव्हर्जंट मुलांसाठी आणि अनेकांसाठी आरामदायी विभाग तयार केला जाईल. यात अत्यंत स्पर्शात्मक साहित्य, मऊ आसनव्यवस्था, कमी आवाजाची साधने तसेच प्रशिक्षित समन्वयकांकडून आवश्यक मदत पुरवली जाईल.
साहित्यासाठी पर्वणी
गोदरेज इंडस्ट्रीज समूहाचे अध्यक्ष नादिर गोदरेज म्हणाले, “लिटरेचर लाईव्ह ! मुंबई लिटफेस्ट हा मुंबईच्या आत्म्याचा खरा उत्सव आहे. मुंबई हे स्थानिक रस्ते, माणसे आणि संस्कृतीवर बहरले आहे. या शहरातील माणसे मुक्तपणे आपले विचार मांडतात. आपल्या कल्पनांना मोकळीक देऊ शकतात. गोदरेज इंडस्ट्रीज समूहातर्फे, कथाकथनाच्या सामर्थ्यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्हांला लिटफेस्टसोबत पुन्हा भागीदारी करताना अभिमान वाटतो. यंदाच्या महोत्सवात संवाद, सादरीकरण आणि चिंतनाची समृद्ध कलाकृती अनुभवयाला मिळेल. आम्ही या तीन दिवसीय साहित्य आणि जीवनाचा संगम असलेला उत्सव साजरा करण्यासाठी उत्सुक आहोत.”
कवी आणि कादंबरीकार
लिटफेस्टमध्ये कादंबरी, नॉन-फिक्शन, बिझनेस, नाटक लेखनातील पारंगत कलाकारांना प्रतिष्ठित गोदरेज लिटरेचर लाईव्ह पुरस्काराने सन्मानित केले जाईल. प्रसिद्ध गुजराती कवी सितांशु यशचंद्र यांना कवी पुरस्कार आणि सुप्रसिद्ध हिंदी कादंबरीकार व कवी विनोद कुमार शुक्ल यांना जीवनपुरस्काराने सन्मानित केले जाईल.
फेस्टिव्हल सह-संचालक एमी फर्नांडिस म्हणाल्या, “लिटरेचर लाईव्ह! यंदाच्या मुंबई लिटफेस्टच्या १६व्या यशस्वी पर्वाचा आम्ही आनंद साजरा करत आहोत. हा महोत्सव विचारांसाठी, कथांसाठी तसेच संवादासाठी उत्साही व्यासपीठ बनला आहे. या महोत्सव समुदायाला एकत्रित आणत असल्याचे पाहून फार आनंद होत आहे. गोदरेज इंडस्ट्रीजसोबतच्या आमच्या भागीदारीने या प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे. हा महोत्सव साहित्यप्रेमी आत्म्याचा खरा उत्सव बनला असून, पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून पाहिला जाईल.”
गोदरेजने टाटासह केली भागीदारी; आयआयएसची इंडस्ट्री 4.0 साठी कौशल्य विकासावर देण्यात येणार भर