फोटो सौजन्य - Social Media
भारतातील कौशल्य विकासाला गती देण्याच्या उद्देशाने गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप (GEG) ने टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलिंग (TIIS) सोबत भागीदारी केली आहे. या सहकार्याद्वारे, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना इंडस्ट्री 4.0 साठी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून, गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या CSR उपक्रम DISHA अंतर्गत ही भागीदारी 2030 पर्यंत भारतात 100 दशलक्ष कुशल कामगार निर्माण करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला पाठिंबा देईल.
गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या CSR आणि शाश्वतता रिपोर्टिंगच्या प्रमुख अश्विनी देवदेशमुख देवदेशमुख म्हणाल्या, “युवकांना – विशेषतः वंचित राहिलेल्या समाजातील युवकांना- तंत्रज्ञान-चालित जगात भरभराटीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांनी सज्ज करणे हे आमचे ध्येय आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन हे परिवर्तन घडवणारे उद्योग आहेत आणि या क्षेत्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षणामुळे करिअरचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. या भागीदारीच्या माध्यमातून, आम्ही उच्च-गुणवत्तेचे कौशल्य अधिक सुलभ आणि प्रभावी बनवू अशी आशा आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यी कौशल्यपूर्ण तयार होतील.”
या भागीदारीत दोन प्रमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश आहे. पहिला, 36 विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचा व्यापक रोबोटिक्स आणि ऑटोमेशन अभ्यासक्रम असून त्यामध्ये आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली जाईल. दुसरा, मुंबईतील सहा प्रमुख अभियांत्रिकी संस्थांमधील 100 विद्यार्थ्यांसाठी 100 तासांचा मेकॅट्रॉनिक्स आणि ऑटोमेशन कोर्स आहे. हे दोन्ही कार्यक्रम प्रामुख्याने व्यावहारिक शिक्षणावर भर देतात, जिथे विद्यार्थ्यांना 70% वेळ प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर काम करण्याची संधी मिळेल.
या प्रशिक्षण कार्यक्रमात डिजिटल कौशल्य, व्यवसाय संवाद, सहयोग आणि समस्यांवर विचार करण्याची क्षमता वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल. यामुळे विद्यार्थी आधुनिक उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि सॉफ्ट स्किल्ससह सक्षम होतील. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना स्मार्ट फॅक्टरी, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बिग डेटा अॅनालिटिक्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. तसेच, हे प्रशिक्षण त्यांना उत्पादन आणि स्वयंचलित प्रणालींच्या कार्यप्रणालींशी परिचित करून उद्योगातील वास्तवात काम करण्यासाठी तयार करेल. परिणामी, विद्यार्थी रोबोटिक्स, ऑटोमेशन, मेकॅट्रॉनिक्स आणि इतर इंडस्ट्री 4.0 क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी शोधू शकतील आणि भविष्यातील नोकरीच्या मागणीनुसार स्वतःला अद्ययावत ठेवू शकतील.
गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप आणि टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किलिंग (TIIS) मधील प्रमुख भागधारकांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून या भागीदारीला औपचारिक स्वरूप दिले आहे. ही भागीदारी भारतातील कौशल्यातील तफावत दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, कारण यामुळे अधिकाधिक तरुणांना नव्या तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य मिळू शकेल. परिणामी, विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवही मिळेल, ज्यामुळे त्यांची रोजगारक्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. या प्रशिक्षणामुळे केवळ विद्यार्थ्यांना फायदा होणार नाही, तर उद्योगांसाठीही प्रशिक्षित आणि कुशल कामगार उपलब्ध होतील. गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या शाश्वत आणि भविष्यासाठी तयार कार्यबल निर्माण करण्याच्या वचनबद्धतेला हे सहकार्य बळकटी देईल आणि देशातील औद्योगिक क्षेत्रात नवकल्पनांना चालना मिळेल.