गोदरेज एंटरप्राइजेजकडून पुढील 3 वर्षांत 'या' खास कौशल्यांमध्ये 1200 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे नियोजन
गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुप (जीईजी) हा आघाडीचा वैविध्यपूर्ण इंजीनिअरिंग व डिझाइन-केंद्रित समूह उत्पादने, सोल्यूशन्स आणि सेवांमधील ग्राहक अनुभवाला अधिक उत्साहित करत आहे, जेथे त्यांच्या व्यवसायांमधील शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी डिजिटल-केंद्रित वातावरणामध्ये ग्राहकांचा प्रवास अधिक दृढ होत आहे.
आपल्या व्यवसायांमध्ये चांगला ग्राहक अनुभव संपादित करण्यासाठी डिझाइन-केंद्रित इंजीनिअरिंग ग्रुपने पुढील ३ ते ५ वर्षांत नवीन डिजिटल सोल्यूशन्स आणि तंत्रज्ञान प्लटॅफॉर्म्ससह व्यवसाय युनिट्समधील धोरणात्मक डिजिटल प्लॅटफॉर्म्स, एआय व जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानांमध्ये १,२०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूकीचे नियोजन केले आहे.
गोदरेज एंटरप्राइज ग्रुपचे कार्यकारी संचालक नायरिका होळकर म्हणाल्या, ”१.१ बिलियनहून अधिक ग्राहकवर्गासह आम्ही ग्राहकांच्या आमच्यासोबत परस्परसंवाद साधण्याच्या पद्धतीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती कटिबद्ध आहोत. आमचा ग्राहक-केंद्रित इकोसिस्टम निर्माण करण्याचा दृष्टीकोन आहे, जी सर्वांगीण अनुभव देते, ज्यामुळे आमच्या भागधारकांसोबत दृढ संबंधांना चालना मिळेल. अत्याधुनिक डिजिटल व एआय टूल्स, व्यापक कौशल्य प्रशिक्षण आणि परिवर्तनाप्रती अविरत कटिबद्धतेसह आमची ग्राहक अनुभवाच्या भविष्याला आकार देण्याची महत्त्वाकांक्षा आहे.”
नुकतेच, मुंबईतील जीईजी मुख्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल कॉन्क्लेव्हमध्ये जीईजी कस्टमर एक्स्पेरिअन्स रोडमॅपचे अनावरण करण्यात आले. कंपनी आणि उद्योगामधील व्यवसाय प्रमुख या कॉन्क्लेव्हमध्ये एकत्र आले. त्यांनी डिजिटल एकीकरण व ग्राहक-केंद्रित धोरणे व्यवसायांच्या भविष्याला देत असलेला आकार, तसेच जलद अंमलबजावणीसाठी धोरणात्मक सहयोगाचे महत्त्व याबाबत चर्चा केली.
UPS मध्ये मिळते पेन्शन तरीही NPS का आहे बेस्ट, Calculation केल्यास तुम्हीही व्हाल अवाक्
परिवर्तनाच्या दिशेने पहिले पाऊल उचलत ‘वन-कस्टमर’ दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित केले जात आहे, जो व्यवसायांमधील सर्व ग्राहकांच्या परस्परसंवादांना एकाच डेटाबेसमध्ये आणतो. प्रमुख उपक्रम जसे अनोखा कस्टमर आयडी आणि सर्विस ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम सर्वांगीण ग्राहक अनुभवाला चालना देण्यामध्ये मदत करतील.
सेवेमधील सर्वोत्तम पद्धती ओळखण्यासाठी, उत्पादन विकास धोरणांचे नियोजन करण्यासाठी आणि बाजारपेठेच्या जागतिक गरजा समजून घेण्यासाठी या दृष्टीकोनासह अॅडवान्स्ड डेटा अॅनालिटिक्स केले जात आहे. ऑफलाइन व ऑनलाइन असलेले एआय इंटीरिओ फर्निचर आऊटलेट्स, जनरेटिव्ह एआय आधारित चॅटबोट्स ग्राहकांना अधिक सानुकूल पद्धतीने त्यांच्या उत्पादन निवड प्रवासामध्ये मार्गदर्शन करतील.
चीफ डिजिटल अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर विजय बालकृष्णन म्हणाले, ”आम्ही डिजिटलप्रेमी ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आमची ई-कॉमर्स फूटप्रिंट देखील वाढवत आहोत, तसेच खरेदीनंतरच्या उत्साहवर्धक अनुभवासाठी सेवा कार्यसंचालनांमध्ये सुधारणा करत आहोत.”
आपली डिजिटल परिवर्तन ध्येये संपादित करण्यासाठी जीईजीने कंपनीच्या क्षमता वाढवण्यावर, तसेच कर्मचाऱ्यांची कौशल्ये वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, जेथे विक्री, सेवा, मार्केटिंग अशा प्रमुख कार्यचालनामध्ये ६००,००० तासांहून अधिक वेळेपर्यंत प्रशिक्षणाचे नियोजन आहे.






