Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

हाफकिनच्या सर्पदंश लसीचा प्रभावी उतारा आता योग्य ठरणार आहे. सरकार आता साधारण दीड लाख लसींची खरेदी करणार असून पूरपरिस्थितीत याचा चांगला उपयोग करून घेता येणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 02, 2025 | 11:07 AM
सर्पदंशावरील लसीकरण

सर्पदंशावरील लसीकरण

Follow Us
Close
Follow Us:
  • पूरपरिस्थितीत हाफकीनच्या सर्पदंश लसी प्रभावी ठरणार
  • राज्य सरकार  हाफकीनकडून खरेदी करणार दीड लाख लस
  • येत्या काही  दिवसात राज्यभरातील सरकारी रुग्णालयात सर्पदंशाच्या लस उपलब्ध होऊन सर्पदंश आणि लसीबाबत जनजागृती माेहिम
मुंबई/ नीता परब: राज्यभर पावासाने थैमान घातले  आहे. त्यात मराठवाड्यात पावसामुळे सर्प, विंचू प्राणी घराघरात आढळून येत आहेत. याचबराेबर ठाणे  जिल्ह्यातील सर्पदंश रुग्णांमध्ये अलीकडे वाढ झाली  आहे. सर्पदंशामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. याचबराेबर येत्या काही दिवसात ऑक्टाेबर तडाख्याला देखील सुरुवात हाेणार आहे ज्यात सर्प आढळून येण्याचे प्रमाण वाढते.  

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेत, हाफकीन संस्थेकडील सर्पदंशावरील तयार असलेली दीड लाख प्रभावी व परिणामकारक लसींची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने हाफकीनमार्फत करावी,अशा सूचना उपमुख्यंत्री अजित पवार यांनी मंगळवारी  दिल्या आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये येत्या काही  दिवसात या लसी उपलब्ध हाेतील असे  हाफकीनच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून सांगण्यात येत आहे. प्रभावी लस व याेग्य वेळेत उपाचारामुळे नागरिकांचे जीव वाचण्यास माेलाची मदत हाेईल हे मात्र निश्चित.

हाफकीन संस्थेचे सर्पदंश औषध वर्षानुवर्षे गुणवत्ताधारक

 हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे सर्पदंश प्रतिविष (अँटी स्नेक व्हेनम सिरम) हे औषध पोलीव्हॅलेंट आहे.  सर्व प्रकारच्या विषारी सापांवरती हे औषध परिणामकारक आहे. भारतामधील कोणत्याही भागातील कोणत्याही प्रकारचा विषारी सापाचा दंश जरी झाला तरी त्यावर हे औषध परिणामकारक आहे. 

भारतामध्ये मुख्यतः नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चार सापांच्या प्रजाती या विषारी आहेत; इतर प्रकारचे साप हे बिनविषारी या प्रकारात माेडले जातात. सर्पदंश झालेला रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात गेल्यावर तेथील डॉक्टर कोणत्या प्रकारचा साप चावला हे विचारतात आणि त्यानुसार उपचार करतात.

मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चुकल्यास असे करा कॅचअप लसीकरण, जाणून घ्या सविस्तर माहिती

हाफकीन संस्थेचे सर्पदंश प्रतिविष औषध पोलीव्हॅलेंट

हाफकीन महामंडळाचे सर्पदंश प्रतिविष हे इंजेक्शन सर्व प्रकारच्या विषारी सापांवर गुणकारक आहे.  हाफकिन महामंडळाच्या सर्पदंश प्रतिविष या औषध गुणकारी असल्याने रुग्ण लवकर बरा होतो आणि कमी डोस मध्ये रुग्णाचा जीव वाचतो. पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे हे १९७४ सालापासून हाफकिन महामंडळाचे सर्पदंश प्रतिविष औषध वापरून हेमलकसा येथील रुग्णांचे जीव वाचवत आहेत.

इंजेक्शन तयार करण्याच्या प्रक्रियेला लागतात नऊ महिने

हाफकीन महामंडळाचे सर्पदंश प्रतिविष इंजेक्शन हे घोड्यांच्या रक्तांपासून बनते या प्रक्रियेला नऊ महिने लागतात. हे औषध लाईफोलाइज या फ्रान्स तंत्रज्ञानाच्या आधारे बनत असल्यामुळे ते शीतगृहामध्ये किंवा रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायची गरज नसते; सामान्य तापमानात देखील हे औषध राहते. त्यामुळे सर्पदंश प्रतिविष इंजेक्शन आपण कपाटामध्ये किंवा बॅगेमध्ये ठेवू शकतो. डोंगराळ प्रदेशात ट्रेकिंगला जाताना किंवा जंगल सफारी करताना सर्पदंश प्रतिविष इंजेक्शन स्वतःजवळ ठेवण्यात यावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

व्हायरल न्यूमोनियावरील लसीकरण, कोणत्या लस घेणे आवश्यक सांगताहेत तज्ज्ञ

रुग्णांना  मिळतेय जीवनदान!

‘सध्या हाफकीनकडे सर्पदंशावरील दीड लाख लस तयार आहेत. सर्पदंशावरील हाफकीनने तयार केलेली लस प्रभावी व परिणामकारक आहे. या लसींची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने हाफकीनमार्फत करण्यात येणार आहे.  ज्या-ज्यावेळी देश अथवा राज्यावर काेणतीही नैसगिर्क  आपत्ती  आली, त्यावेळी हाफकीन महामंडळाने नेहमीच वैद्यकीय मदत केली  आहे. हाफकीन संस्थेची लसीची गुणवत्ता विश्वासार्हतामुळे  रुग्णांना जीवदान मिळत  आहे, ही बाब हाफकीन संस्थेसाठी सकारात्मक आहे.’ – सुनील महिंद्रकर, व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ

Web Title: Haffkine corporation s effective vaccine against snakebite public awareness campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • Haffkine Institute
  • Health Tips
  • vaccination in India

संबंधित बातम्या

थंडीत आखडतात शरीरातील 100 पेक्षा अधिक सांधे, 5 सोपी कामं जे त्रासापासून ठेवतील दूर
1

थंडीत आखडतात शरीरातील 100 पेक्षा अधिक सांधे, 5 सोपी कामं जे त्रासापासून ठेवतील दूर

Screen Time Obesity: मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याला कारणीभूत ठरतोय ‘हा’ डिव्हाईस, पालकांना दिला बालरोगतज्ज्ञांनी इशारा
2

Screen Time Obesity: मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याला कारणीभूत ठरतोय ‘हा’ डिव्हाईस, पालकांना दिला बालरोगतज्ज्ञांनी इशारा

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे
3

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, चांगल्यातील चांगले अन्नही होऊ शकते 5 चुकांमुळे विष
4

पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, चांगल्यातील चांगले अन्नही होऊ शकते 5 चुकांमुळे विष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.