फोटो सौजन्य - Social Media
सध्या केसगळती ही समस्या इतकी सामान्य झाली आहे की हवामान थोडंसं बदललं की आपल्याला वाटतं, की ‘ऋतू बदलतोय म्हणून केस गळत आहेत’. पण खरी गोष्ट ही आहे की यामागे ऋतू बदलणं हे फक्त एक कारण आहे. अनेकदा आपण रोजच्या आयुष्यात घेतलेले चुकीचे आहार, कमी झोप, मानसिक ताणतणाव आणि सतत वापरली जाणारी केमिकलयुक्त उत्पादने हे अधिक जबाबदार असतात.
बहुतेक वेळा केस गळायला लागले की आपण पटकन शांपू, ऑइल किंवा कंडिशनर बदलतो. पण हे लगेच उत्पादने बदलणं कधी कधी केसांच्या आरोग्यावर आणखी वाईट परिणाम करू शकतं. अशा वेळी काही तज्ज्ञ, विशेषतः आयुर्वेदिक पद्धतीवर विश्वास ठेवणारे, नैसर्गिक घरगुती उपायांची शिफारस करतात.
डॉ. शैल गुप्ता हे प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की, बहुतांश प्रकरणांमध्ये घरगुती उपायच अधिक फायदेशीर ठरतात. त्यांचा असा विश्वास आहे की निसर्गातील घटक केसांच्या मुळांवर काम करतात आणि त्यामुळे केसांची गळती थांबवण्यास मदत होते. त्यामुळे अनेकदा महागडी उत्पादने वापरण्यापेक्षा आपण घरात असलेले सोपे उपाय वापरले तरी पुरेसे असते.
तीन घटकांचा प्रभावी उपाय
केसगळतीवर एक अत्यंत प्रभावी, सोपा आणि खर्चिक नसलेला उपाय म्हणजे कांद्याचा रस, नारळाचं तेल आणि लिंबाचा रस यांचा वापर. हे तीन घटक एकत्र केल्यावर तयार होणारं मिश्रण स्काल्पला पोषण देतं, डँड्रफ दूर करतं आणि केसांना मजबुती प्रदान करतं.
उपाय कसा करायचा?
हे तिन्ही एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांच्या मुळांमध्ये बोटांनी सौम्यपणे मसाज करत लावा. साधारणपणे २० मिनिटे ठेवून नंतर माइल्ड शांपूने केस स्वच्छ धुवा. हा उपाय आठवड्यात दोन वेळा करा. तीन आठवडे नियमित वापरल्यास केस गळती कमी होते हे लक्षात येईल.
घटकांचे फायदे
केस गळत असतील तर लगेच उत्पादनं बदलण्याऐवजी, आधी केसांच्या मूळ समस्येवर काम करणं महत्त्वाचं आहे. घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी केवळ केसगळतीच नाही, तर एकूण केसांचं आरोग्य सुधारता येतं. फक्त नियमितता आणि संयम आवश्यक आहे. आठवड्यात दोनदा हा उपाय करून तुम्ही तुमचे केस पुन्हा एकदा दाट, आरोग्यदायी आणि चमकदार बनवू शकता.