
एक अनोखे मंदिर जिथल्या दगडांमधून ऐकायला येत मधुर संगीत, विज्ञानालाही घातलंय याने कोड...
भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट… या दिवसापासून घेता येणार दर्शन
१५ व्या शतकात केलंय बांधकाम
विजयनगर साम्राज्याचे राजा देवराय द्वितीय यांच्या कारकिर्दित १५ व्या शतकात या मंदिराचे बाधकाम करण्यात आले होते. पुढे राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराचा विस्तार केला. हे मंदिर भगवान विठ्ठलाला समर्पित आहे. याच्या भिंतीवर सुबक कोरीवकाम करण्यात आलं आहे जे पाहताच त्यातील आकृती जिवंत असल्याचा भास होतो. मंदिराच्या परिसरात एक भव्य दगडी रथ देखील आहे, याला भारतातील सर्वात प्रसिद्ध दगडी रथांपैकी एक मानले जाते. याची रचना फार अचूक असून
मंदिर परिसरात प्रवेश करताच सर्वात आधी नजर खिळते ती म्हणजे भव्य दगडी रथ. हा भारतातील तीन सर्वात प्रसिद्ध दगडी रथांपैकी एक आहे. त्याची रचना इतकी अचूक आहे की, पहिल्यांदा याकडे पाहताच तो एकाच अखंड दगडापासून बनवल्याचा भास होतो. पण प्रत्यक्षात त्याला ग्रॅनाइटच्या मोठ्या दगडांच्या संयोगातून तयार करण्यात आले आहे. विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासाच्या काळात या रथाचे मोठे नुकसान झाले पण आजही तो आपल्या वैभवाची कहाणी सांगतो.
सारेगामा स्तंभांचे रहस्य
हंपी येथील या विठ्ठल मंदिराचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्य म्हणजे, त्याचे ५६ संगीतमय स्तंभ… हे स्तंभ ‘सा रे गा मा’ स्तंभ या नावानेही ओळखले जातात. मंदिराच्या महामंडपामध्ये हे स्तंभ बसवण्यात आले आहे. तुम्ही जेव्हा यांना हळूवारपणे स्पर्श करता तेव्हा यातून एक मोहक ध्वनी बाहेर पडतो. असं म्हणतात की, या स्तंभातून संगीताच्या सात सुरांचा आवाज ऐकायला येतो. हे स्तंभ ग्रॅनाईटच्या एकाच अखंड तुकड्यापासून कोरलेले आहे. मुख्य स्तंभाच्या भोवती सात लहान स्तंभ आहेत ज्यातील प्रत्येक स्तंभातून आपल्याला वाद्याचा आवाज ऐकायला येतो. एका दगडातून इतके सुंदर स्वर कसे बाहेर पडत आहेत याचे कोडे तर आजवर शास्त्रज्ञांनाही उलगडलेले नाही.
असं म्हणतात की, ब्रिटिश राजवटीच्या वेळी इंग्रजांनी या स्वरांचे रहस्य उलगडून पाहण्यासाठी दोन स्तंभ कापले पण त्यांना आत काहीच सापडलं नाही. ते दगड आतून पोकळे होते. आजही मंदिर परिसरात आपल्याला ते पाहता येतात. मंदिराचे आंगण हे इतके मोठे आहे की हजारो लोक इथे एकावेळी उभे राहू शकतात. तसेच संध्याकाळी जेव्हा मावळत्या सूर्याची किरणे या दगडांवर पडतात तेव्हा ही दगडं सोनेरी रंगात चमकताना दिसतात.