Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सरला नष्ट करण्यासाठी दररोज प्या हे 3 शक्तिशाली ड्रिंक्स; स्वतः हार्वर्ड डॉक्टरने दिला सल्ला

तुम्हाला माहिती आहे का रोजच्या जीवनातील काही सध्या आणि सोप्या सवयी तुम्हाला कर्करोगाच्या आजारापासून वाचवत असतात. हार्वर्डच्या डॉक्टरांनी 3 प्रभावी ड्रिंक्स सांगितले आहेत जे कर्करोगाच्या आजरापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2025 | 09:37 AM
कँसरला नष्ट करण्यासाठी दररोज प्या हे 3 शक्तिशाली ड्रिंक्स; स्वतः हार्वर्ड डॉक्टरने दिला सल्ला

कँसरला नष्ट करण्यासाठी दररोज प्या हे 3 शक्तिशाली ड्रिंक्स; स्वतः हार्वर्ड डॉक्टरने दिला सल्ला

Follow Us
Close
Follow Us:

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे आपण कमी वयातच अनेक आजारांना खुले आमंत्रण देत असतो आणि यातीलच एक आजार म्हणजे कँसर! आजकाल कर्करोगाचा धोका फार वाढला आहे. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी कर्करोग हा एक प्रमुख कारण आहे. दरवर्षी लाखो लोकांना याचे निदान होते आणि या आजारामुळे मोठ्या संख्येने मृत्यू होतात. अशात कर्करोग दूर करण्यासाठी काही पथ्ये पाळणे, योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. यासोबतच आम्ही तुम्हाला आज विशेष अशा 3 ड्रिंक्सविषयी माहिती देत आहोत, ज्यांचे नियमित सेवन केल्यास तुम्ही कँसरला लवकर दूर पळवू शकता. हे पेय कर्करोगाचा धोका अनेक पटींनी कमी करतात आणि हे आम्ही नाही तर स्वतः हार्वर्ड प्रशिक्षित डॉक्टर सांगत आहेत. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि सोशल मीडिया व्यक्तिमत्व डॉ. सौरभ सेठी यांनी अशा तीन शक्तिशाली ड्रिंक्सविषयी माहिती दिली आहे, जे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी २० रुपयांचा ‘हा’ पदार्थ नक्की वापरा, त्वचा होईल मुलायम सुंदर

हार्वर्ड प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी विज्ञान समर्थित काही ड्रिंक्सविषयी माहिती दिली आहे जे नैसर्गिकरित्या तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि यामुळे जळजळ देखील कमी होईल. कर्करोग रोखण्यासाठी हे एक प्रमुख घटक आहे. चला यात कोणकोणत्या ड्रिंक्सचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

ग्रीन टी

डॉ. सौरभ सेठी यांनी कर्करोग रोखण्यासाठी ग्रीन टीचे सेवन प्रभावी असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, ग्रीन टीमध्ये कॅटेचिन सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. माचा हा ग्रीन टीचा एक केंद्रित प्रकार आहे आणि म्हणूनच तो आणखी शक्तिशाली आहे. सकाळी उठताच तुम्ही याचे सेवन करू शकता.

ग्रीन स्मूदी

याशिवाय, तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या स्मूदीजचा समावेश करू शकता . ते पोषक तत्वांनी समृद्ध आणि दाहक-विरोधी असते. ते बनवण्यासाठी, पालक किंवा केल सारख्या हिरव्या पालेभाज्या घेऊन त्यात काकडी, सेलेरी, थोडे आले आणि पाणी घालून मिसळा आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या. रोज सकाळी आपल्या डाएटमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता.

आठवड्यातून एकदाही दारू पिणे ठरते घातक; शरीरात वाढतोय कर्करोगाचा धोका; वेळीच सावध व्हा! WHO दिली वाॅर्निंग

तुर्मरिक लाटे

हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे जळजळांशी लढते आणि कर्करोगविरोधी गुणधर्म देखील आहे. डॉक्टरांनी सांगितले की हे पेय त्यांचे आवडते आहे आणि ते ते बदामाचे दूध आणि चिमूटभर काळी मिरी घालून बनवतात. हळद अनेक आजारांवर एक रामबाण उपाय मानला जातो अशात तुम्ही अनेक प्रकारे याचा आपल्या आहारात समावेश करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Harvard doctor suggested 3 powerful drinks that can lower your the cancer risk lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

मासिक पाळीपूर्वी वा नंतर होत असेल ‘White Discharge’, तज्ज्ञांकडून जाणून घ्या नॉर्मल आहे की नाही
1

मासिक पाळीपूर्वी वा नंतर होत असेल ‘White Discharge’, तज्ज्ञांकडून जाणून घ्या नॉर्मल आहे की नाही

World Toilet Day: 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिन? इतिहास, महत्त्व आणि थीम घ्या जाणून
2

World Toilet Day: 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिन? इतिहास, महत्त्व आणि थीम घ्या जाणून

चेहऱ्याच्या मसल्स होतील मोकळ्या! पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे, त्वचा होईल सुंदर
3

चेहऱ्याच्या मसल्स होतील मोकळ्या! पांढऱ्याशुभ्र चौकोनी बर्फाच्या तुकड्याचे शरीराला होतील भरमसाट फायदे, त्वचा होईल सुंदर

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात
4

2 साहित्यांपासून घरीच तयार करा डायबिटीजचे औषध, वैद्यांनी दिला सल्ला; फक्त 40 दिवसांतच शुगर राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.