Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काश्मिरी खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ Mutton Rogan Josh कधी चाखला आहे का? लगेच नोट करा रेसिपी

नॉनव्हेज लव्हर्स असाल तर काही नवीन खाऊन पाहायचे असेल तर यंदा घरी काश्मीरी स्टाईल मटणाची ही नवीन रेसिपी नक्की बनवून खा. याची मसालेदार चव तुम्हाला खूप आवडेल. अनेक हॉटेल्समध्ये हा पदार्थ सर्व्ह केला जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 29, 2025 | 09:47 AM
काश्मिरी खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ Mutton Rogan Josh कधी चाखला आहे का? लगेच नोट करा रेसिपी

काश्मिरी खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ Mutton Rogan Josh कधी चाखला आहे का? लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

विकेंडचा दिवस, हा दिवस म्हणजे अनेकांच्या सुट्टीचा! विकेंडच्या दिवशी अनेकांच्या घरी टेस्टी आणि मसालेदार नॉनव्हेजचा प्लॅन बनतो. अशात आज आम्ही तुमच्यासाठी काश्मीरची फेमस आणि पारंपरिक डिश मटण रोगन जोशची एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. यामध्ये मटण लाल रंगाच्या मसाल्याच्या करीमध्ये शिजवले जाते. मसाल्यांमध्ये शिजवलेले हे मटण चवीला फार छान आणि लज्जतदार लागते.

जेवणाला तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत शेंगदाण्याची चटणी; चव अशी की दोन घास जास्तीचे खाल

पारंपरिकपणे ही डिश मेंढ्याच्या मटणापासून बनवली जाते आणि ती तूप, दही व सुगंधी मसाल्यांमध्ये शिजवली जाते. भात किंवा नानबरोबर ही रेसिपी फारच चविष्ट लागते. नवनवीन रेसिपीज ट्राय करायला आवडत असतील तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी बनवून पहा. याची चव घरातील सर्वांनाच फार आवडेल. चला तर मग नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • मटण – ५०० ग्रॅम (हाडासकट)
  • कांदे – २ मध्यम (बारीक चिरलेले)
  • दही – १ कप (फेटून)
  • आलं-लसूण पेस्ट – २ टेबलस्पून
  • हिंग – १ चिमूट
  • लाल तिखट (कश्मिरी मिरची) – २ टेबलस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • धणे पूड – १ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • दालचिनी – १ तुकडा
  • तमालपत्र – १
  • जावित्री – १ लहान तुकडा (ऐच्छिक)
  • दही मटनसाठी – थोडे पाणी
  • मीठ – चवीनुसार
  • तेल किंवा तूप – ३ टेबलस्पून
विकेंड स्पेशल घरी काहीतरी चमचमीत होऊन जाऊद्यात; एकदा नक्की बनवून पहा मसालेदार Chicken Tikka Biryani

कृती

  • मटण रोगन जोश बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईत किंवा प्रेशर कुकरमध्ये तेल/तूप गरम करून त्यात दालचिनी, तमालपत्र, आणि हिंग टाका.
  • त्यात चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परतवा.
  • आलं-लसूण पेस्ट घालून २-३ मिनिटे परतवा.
  • नंतर मटण घालून मध्यम आचेवर ८-१० मिनिटे परतत ठेवा, जोपर्यंत मटण रंग बदलत नाही.
  • आता हळद, धणे पूड, लाल तिखट आणि मीठ घालून नीट मिसळा.
  • फेटलेले दही थोडे थोडे घालून मिश्रणात नीट मिसळा. दही फाटू नये म्हणून आच मंद ठेवा.
  • १ कप पाणी घालून झाकण लावून मटण शिजू द्या. (प्रेशर कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या किंवा पातेल्यात ४५-५० मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर)
  • शेवटी गरम मसाला आणि जावित्री पूड टाका. अजून ५ मिनिटं शिजवून गॅस बंद करा.
  • गरमागरम मटण रोगन जोश भात, जीरा राईस किंवा नानसह सर्व्ह करा. त्याच्या रंग, सुगंध आणि समृद्ध चवमुळे ही
  • रेसिपी खास प्रसंगी अतिशय उत्तम पर्याय ठरते.
  • ही रेसिपी जास्त तेलकट न वाटण्यासाठी तुपाचे प्रमाण कमी करता येते. तसेच, झणझणीत चव हवी असल्यास गरम मसाल्याचे प्रमाण वाढवू शकता.

Web Title: Have you ever tasted mutton rogan josh a popular dish in kashmiri cuisine note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 09:47 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Mutton

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
1

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

Healthy Recipe : हेल्दी पण टेस्टी असं काही खायचंय? मग जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश ‘लो-कार्ब नूडल्स’ घरी बनवून खा
2

Healthy Recipe : हेल्दी पण टेस्टी असं काही खायचंय? मग जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश ‘लो-कार्ब नूडल्स’ घरी बनवून खा

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी
3

साऊथ इंडियन पदार्थाने वाढवा जिभेची चव! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा वन पॉट रस्सम राईस, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा
4

Recipe : शाही, सुगंधित चवीचा ‘बगारा राईस’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? एकदा घरी बनवूनच पहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.