Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Head Neck Cancer: सर्दी-खोकला समजून दुर्लक्ष करू नका; डोके आणि मानेच्या कर्करोगाची 5 सुरुवातीची लक्षणे

सतत सर्दी खोकला होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे तुमच्या जीवावर बेतू शकते. कारण ही साधारणतः डोकं आणि मानेच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांनी दिली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 23, 2026 | 04:22 PM
डोक्याच्या आणि मानेच्या कर्करोगाच्या लक्षणाबाबत माहिती (फोटो सौजन्य - iStock)

डोक्याच्या आणि मानेच्या कर्करोगाच्या लक्षणाबाबत माहिती (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • सतत सर्दी खोकल्याकडे दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते 
  • डोकं मानेच्या कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो
  • काय आहेत नक्की लक्षणे 
अनेकजण घशात खवखव, आवाज बसणे किंवा तोंडात लहानशी जखम होणे यांसारख्या समस्यांकडे साधा सर्दी-खोकला किंवा हंगामी संसर्ग समजून दुर्लक्ष करतात. मात्र, ही लक्षणे सतत कायम राहिल्यास ती डोके आणि मानेच्या कर्करोगाची (Head & Neck Cancer) सुरुवातीची चिन्हेही असू शकतात. 

भारतात डोके आणि मानेचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे आणि वेळेवर निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. अपोलो हॉस्पिटल्सच्या सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विदिता पोवळे यांच्या मते, यांच्या मते, हे दुर्लक्ष करणेच जीवावर बेतू शकते. यासाठी कोणती लक्षणे कळायला हवीत समजून घ्या 

शरीरात कर्करोग आहे की नाही? ओळखणे फार सोपे; जाणून घ्या प्रक्रिया

डोके आणि मानेच्या कर्करोगांची लक्षणे 

  • दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ घशात खवखव किंवा वेदनाः घशात वेदना किंवा खवखव सामान्य औषधे घेतल्यानंतरही दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास, त्याकडे केवळ संसर्ग समजून दुर्लक्ष करणे योग्य नाही. हे घसा किंवा स्वरयंत्राच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतो
  • आवाज सतत बसणे किंवा बदलणेः जर तुमचा आवाज सतत जड, बसलेला किंवा बदललेला वाटत असेल आणि ही स्थिती दोन ते तीन आठवडे कायम राहिली, तर तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. हे स्वरयंत्राच्या (Voice Box) कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते
  • तोंडातील जखम जी भरून येत नाहीः तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे, वारंवार होणारे अल्सर किंवा अशी जखम जी तीन आठवड्यांनंतरही बरी होत नाही, हे गंभीर संकेत असू शकतात. विशेषतः तंबाखू किंवा सुपारीचे सेवन करणाऱ्यांनी याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये
  • गिळताना त्रास किंवा वेदनाः अन्न किंवा पाणी गिळताना वेदना होणे, वारंवार अन्न अडकल्यासारखे वाटणे किंवा गिळण्यास सतत अडचण येणे, हे घसा किंवा अन्ननलिकेच्या वरच्या भागातील कर्करोगाचे लक्षण असू शकते
  • मानेमध्ये वेदनारहित गाठः मानेमध्ये वेदनारहित गाठ सतत राहणे किंवा हळूहळू वाढत जाणे, याकडे साधी सूज समजून दुर्लक्ष करू नका. अनेकदा हे डोके आणि मानेच्या कर्करोगाचे पहिले लक्षण असते.
World Cancer Day: शेवग्याच्या शेंगांमुळे कॅन्सरला लागू शकते रोख, Sadhguru ने दिला खाण्याचा मूलमंत्र; रक्तही वाढेल

प्रमुख जोखीम घटक कोणते?

तंबाखूचे सेवन, धूम्रपान, अतिप्रमाणात मद्यपान आणि काही प्रकरणांमध्ये एचपीव्ही (HPV) संसर्ग हे डोके आणि मानेच्या कर्करोगाचे प्रमुख जोखीम घटक आहेत. यापासून बचाव करणे, निरोगी जीवनशैली अंगीकारणे आणि कोणतेही असामान्य लक्षण दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आज आधुनिक शस्त्रक्रिया, रोबोटिक तंत्रज्ञान, रेडिएशन आणि औषधोपचारातील प्रगतीमुळे डोके आणि मानेच्या कर्करोगावर प्रभावी उपचार शक्य झाले आहेत, विशेषतः आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास. लक्षात ठेवा, वेळेवर तपासणी हाच जीव वाचवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे.

Web Title: Head neck cancer early symptoms do not ignore cold cough

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • Health Tips

संबंधित बातम्या

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
1

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
2

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
4

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.