अंजीर खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
निरोगी आरोग्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. आहारात सुका मेवा, फळे, भाज्या, पौष्टिक पदार्थ इत्यादी पदार्थांचे सेवन करूनही हृदयाचे आरोग्य बिघडते. शरीरातील प्रमुख अवयव म्हणजे हृदय. हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. हृदयविकाराचा झटका येणे, शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गोष्टी हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात अंजीरचे सेवन करावे. अंजीर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अंजीर खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
अंजीरमध्ये फायबर,विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के आणि विटामिन 6 इत्यादी घटक आढळून येतात. याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह इत्यादी गुणधर्म आढळून येतात. अंजीरमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स शरीराचा मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करतात. अंजीर खाल्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून सुटका मिळते शिवाय बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला अंजीर खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते. ज्यामुळे इतर गंभीर आजार होऊ लागतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात कमीत कमी साखरेचे पदार्थ खावेत. अंजीर खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. अंजीरमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आहारात अंजीरचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात अंजीरचे सेवन करावे. यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही. तसेच दिवसभरात 2 ते 3 अंजीरचे सेवन करावे, त्यापेक्षा जास्त अंजीर खाऊ नये.
हृदयाच्या आरोग्यासाठी अंजीरचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अंजीर खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीरचे सेवन करावे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. याशिवाय रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होतात.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
अंजीर खाल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अंजीर असेच न खाता पाण्यात भिजवून ठेवा. पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर अंजीरची चव अतिशय चांगली लागते. अंजीरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस इत्यादी घटक हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हाडांमधील घनता वाढवण्यासाठी अंजीरचे सेवन करावे.