Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips : इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरताय ? मग आताचा सोडा ही सवय, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

इनहेलर आणि नोज स्प्रेमुळे नाक मोकळं होतं. कधी बारा तास तर आठ तास असा याचा कालावधी असतो. सर्दीवर याचा तात्पुरता परिणाम होत असला तरी, याची सवय होणं हृदयाच्य़ा आजारांना आमंत्रण देतं, कसं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 02, 2025 | 06:54 PM
Health Care Tips :  इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरताय ? मग आताचा सोडा ही सवय, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती
Follow Us
Close
Follow Us:
  • इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरताय ?
  • मग आताचा सोडा ही सवय
  • डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

सततच्या धावपळीमुळे आणि प्रदुषणामुळे खूप जणांना अ‍ॅलर्जीची सर्दी जाणवते. हवेतील प्रदुषण किंवा धुळीमुळे शिंका येणं, सर्दी होणं या प्रकार दिसून येतो. यामुळे अनेकजण इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरतात. मात्र याची सवय आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं आहे. अति तिथे माती अशी एक म्हण आहे. कुठल्याही गोष्टी प्रमाणाबाहेर वापर झाला तर त्याची माती ही होतेच. हेच औषधांच्या बाबतीतही लागू होतं. सर्दी झाल्यावर अनेकांना इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरण्याची सवय असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे इनहेलर आणि नोज स्प्रे आहेत. याप्रत्येकाचा परिणाम काही मिनिटभरात होतो आणि नाक मोकळं होतं कधी बारा तास तर आठ तास असा याचा कालावधी असतो. याने होतं काय तर, सर्दीवर याचा तात्पुरता परिणाम होत असला तरी, याची सवय होणं हृदयाच्य़ा आजारांना आमंत्रण देतं, कसं ते जाणून घेऊयात.

आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, इनहेलर किंवा नोज स्प्रेतील स्टेरॉइड घटक श्वसनमार्गातील सूज कमी करतात, याने नाक मोकळं होतं खरं मात्र त्याचा अतिवापर केल्यास नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे लहानसहान सर्दी, खोकला किंवा धुळीचा संपर्क यामुळेही त्रास वाढतो. काही प्रकरणांमध्ये नाकातील त्वचा याने कोरडी पडते, त्यामुळे नाकातून रक्त येणे, गंध जाणे अशा समस्या जाणवतात. त्याचशिवाय नाकाच्या संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकते.इनहेलरचा अति वापर केल्यास याचा परिणाम घशावर देखील जाणवतो. . एवढंच नाही तर भविष्य़ात या सवयी हृदय विकाराचा झटका येण्यास देखील कारणीभूत ठरु शकते.

सतत घसा बसणे, आणि हृदयगती वाढणे असे गंभीर परिणाम यामुळे दिसून येतात. अनेक रुग्ण इनहेलर किंवा नोज स्प्रे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ वापरतात. मात्र ही सर्वात मोठी चूक ठरते.तज्ज्ञ सुचवतात की, या औषधांचा वापर केवळ तात्पुरता आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा. तसेच धूळ, धूर, परफ्युम, पाळीव प्राणी यांसारख्या अ‍ॅलर्जीक घटकांपासून दूर राहणे, घरातील हवा शुद्ध ठेवणे आणि श्वसनव्यायाम (प्राणायाम) करणे हा उत्तम पर्याय ठरतो.शेवटी, इनहेलर आणि नोज स्प्रे हे उपाय आहेत, कायमस्वरूपी समाधान नाही. त्यामुळे “सहज सवय” न बनवता वैद्यकीय सल्ल्यानुसार वापर करणं गरजेचं आहे.

आजीबाईच्या बटव्यातील आयुर्वेदिक उपाय! थंडीमुळे घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी प्या औषधी काढा,नाक चोंदण्यापासून मिळेल आराम

दमा, सायनस, अ‍ॅलर्जी, श्वास घेण्याचा त्रास किंवा सतत सर्दी-खोकला अशा समस्या आजच्या बदलत्या हवामानात आणि प्रदूषणामुळे सर्वसामान्य झाल्या आहेत. यावर तातडीचा उपाय म्हणून अनेक जण इनहेलर किंवा नोज स्प्रे वापरतात. काही लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने हे वापरतात, तर अनेकजण स्वतःहूनच “सवय” लावून घेतात. पण आता तज्ज्ञांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. तुम्हालाही नोज स्प्रे किंवा इनहेलरची सवय असेल तर तुमचं आरोग्य दीर्घकाळासाठी धोक्यात येऊ शकतं. या औषधांमध्ये प्रामुख्याने स्टेरॉइड्स, डीकॉन्जेस्टंट्स आणि केमिकल घटक असतात. हे घटक नाकातील किंवा श्वसनमार्गातील सूज कमी करून काही मिनिटांत आराम देतात. म्हणूनच लोकांना तत्काळ फरक जाणवतो. मात्र याचा अतिवापर अनेक आजारांना आमंत्रण देतो. त्यामुळे साधी सर्दी असो किंवा अ‍ॅलर्जीची सर्दी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार स्वत:चे स्वत: करु नयेत.

World Vegan Day : मधुमेहाचे नैसर्गिक व्यवस्थापन, डॉक्टर शाकाहार व्हेगन डायट का सुचवतात?

Web Title: Health care tips side effects of using an inhaler or nose spray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 06:53 PM

Topics:  

  • Health News
  • heart care tips

संबंधित बातम्या

Solapur News: 24 हजार रूग्णांना ‘आयुष्यमान भारत योजने’चा लाभ; तब्बल 55 कोटींचा निधी वितरित
1

Solapur News: 24 हजार रूग्णांना ‘आयुष्यमान भारत योजने’चा लाभ; तब्बल 55 कोटींचा निधी वितरित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.