पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणती योगासने करावीत
अनेकदा ऑफिसमध्ये तासनतास बसून पाठ दुखीची समस्या उद्भवते. पाठ दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण शरीर हळूहळू दुखू लागत. त्यामुळे वेळीच या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, आहारात विटामिनची कमतरता इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आधी लोकांना वयाच्या साठीनंतर पाठदुखी किंवा कंबर दुखीचा त्रास होत असे, पण बदलत्या जीवनशैलीमुळे वयाच्या तिशीमध्येच अनेकांना पाठ दुखीचा त्रास होऊ लागला आहे. पाठ दुखी झाल्यानंतर चालताना किंवा खाली बसल्यावर उठताना अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणती योगासने करावीत, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
भुजंगासन केल्यामुळे पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. हे आसन करताना सगळ्यात आधी पोटावर झोपा, त्यानंतर दोन्ही पाय एकत्र करा आणि तळवे छातीजवळ खांद्याच्या पातळीवर ठेवा. नंतर कपाळ जमिनीवर ठेवून शरीराला आरामदायी करा. हे सर्व झाल्यानंतर दीर्घ श्वास घेतल्यावर शरीराचा पुढचा भाग वर उचला. दोन्ही हात सरळ करून 1 ते 2 सेकंड या स्थितीमध्ये राहा. त्यानंतर श्वास सोडून सामान्य स्थितीमध्ये पुन्हा परत या.
हे देखील वाचा: सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी प्या ‘या’ पानांचा चहा, रोगप्रतिकारशक्ती वाढेल
उष्ट्रासन करताना गुडघ्यांवर बसून दोन्ही गुडघ्यांची रुंदी खांद्या इतकी ठेवा. त्यानंतर तळवे आकाशाकडे वर करून पाठीचा कणा पाठीमागे वाकवताना दोन्ही हातांनी टाचांना स्पर्श करा. या स्थितीमध्ये मानेवर जास्त दाब देऊ नका. कंबरेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ सरळ राहिल्यानंतर 1 ते 2 सेकंड या स्थितीमध्ये राहून नंतर समस्या स्थितीमध्ये यावे.
हे देखील वाचा: झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिण्याचे फायदे
पाठदुखीचा समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित शलभासन करावे. हे आसन केल्यामुळे पाठदुखीची समस्या कमी होऊन पाठीमधील वेदना कमी होतात. हे आसन करताना पोटावर झोपून दोन्ही तळवे मांड्यांच्या खाली ठेवा. त्यानंतर हळूहळू पाय वर करून वरच्या दिशेने पाय घेऊन दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंड या स्थितीमध्ये राहिल्यानंतर सामान्य स्थितीमध्ये यावे.