
फॅट बर्न जेवल्यानंतर करता येतात का (फोटो सौजन्य - iStock)
१५ ते २० मिनिटे चालल्याने शरीराला रक्तातील साखरेचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होऊ शकते. जेवणातील कार्बोहायड्रेट्समुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. अशावेळी हलकी शारीरिक हालचाल केल्याने स्नायू ग्लुकोजचा ऊर्जेसाठी वापर करतात. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी होण्यास आणि शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. डॉ. गौरव गुप्ता, कन्सल्टंट – इंटरनल मेडिसिन, सैफी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत व्यवस्थित माहिती दिली आहे.
प्रीडायबेटीस, इन्सुलिन रेसिस्टन्स, लठ्ठपणा किंवा फॅटी लिव्हर असलेल्या व्यक्तींसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. जेवणानंतर नियमित चालण्यामुळे ग्लुकोज मेटाबॉलिझमला मदत होऊन रक्तातील साखरेची दीर्घकाळ राहणारी वाढ कमी करण्यास हातभार लागू शकतो. कालांतराने रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारल्याने एकूण मेटाबॉलिक आरोग्याला फायदा होऊ शकतो.
व्यायामासाठी वेळ नसला तरी करु नका चिंता, ऑफीसमध्येही ‘या’ सोप्या पद्धती वापरून करु शकता फॅट बर्न
फॅटी लिव्हर किंवा शरीराचे अतिरिक्त वजन असलेल्या व्यक्तींसाठी जेवणानंतर चालणे हा कठीण व्यायाम न करता दैनंदिन शारीरिक हालचाल वाढवण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो. यामध्ये सातत्य महत्त्वाचे आहे. जेवणानंतरची छोटीशी चाल फॅट मोठ्या प्रमाणात जाळणार नाही; मात्र संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीसोबत ती वजन व्यवस्थापन आणि मेटाबॉलिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
चालण्याचा वेगही खूप जास्त असण्याची गरज नाही. आरामदायी किंवा हलक्या वेगाने केलेले ब्रिस्क वॉकिंग शरीराला ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास मदत करू शकते. त्यामुळे जेवणानंतर चालणे ही सहज अंगीकारता येणारी आणि टिकवून ठेवता येणारी सवय ठरू शकते.
त्यामुळे जेवणानंतर १५ ते २० मिनिटे चालणे हे फॅट बर्न करण्याचा शॉर्टकट म्हणून पाहू नये. मात्र, रक्तातील साखर आणि इन्सुलिन मेटाबॉलिझमसाठी त्याचे महत्त्वपूर्ण फायदे होऊ शकतात. विशेषतः प्रीडायबेटीस, फॅटी लिव्हर किंवा अतिरिक्त वजन असलेल्या व्यक्तींनी जेवणानंतर थोडे चालणे ही दैनंदिन दिनचर्येतील एक सोपी आणि उपयुक्त सवय बनवू शकते.
1 किलो वजन कमी करण्यासाठी रोज इतक्या किलोमीटरने धावाल तरच विरघळेल शरीराची चरबी