कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे गुणकारी फायदे
भारतीय स्वयंपाक घरात तुपाचा वापर जेवण बनवण्यासाठी केला जातो. शिवाय धार्मिक विधींमध्ये तुपाचा वापर करतात. तूप खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आणि गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर किंवा इतरवेळी नियमित एक चमचा तूप खाल्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतील. तूप खाल्यामुळे शरीराला आतून पोषण मिळते. आयुर्वेदामध्ये तुपाला अमृता समान मानले जाते. डॉक्टरांकडे गेल्यानंतर सुद्धा निरोगी आरोग्यासाठी तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. तूप खाणे आरोग्यासाठीच नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे. पूर्वीच्या काळातील लोक तुपाचा वापर रोजच्या आहारात करत होतील. डाळ भात जेवणास घेतल्यानंतर वरून एक चमचा तूप टाकून जेवण केल्यास जेवण सहज पचते आणि पचनक्रिया सुधारते.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेकदा डॉक्टर कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचा सल्ला देतात. यामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. तुपामध्ये विटामिन ए, डी, ई आणि के यांसारखे अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आज आम्हीतुम्हाला कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यामुळे त्वचा आणि केसांना अनेक फायदे होतात. तुपामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला आतून पोषण देण्यासाठी मदत करतात. शिवाय नियमित सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. यामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देण्याचे काम करतात. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा चमकदार आणि उजळदार दिसते. त्यामुळे नियमित तुपाच्या पाण्याचे सेवन करावे.
तुपाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास पोटात साचून राहिलेली विषारी घाण स्वच्छ होण्यास मदत होते. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन, जंक फूड इत्यादी पदार्थांच्या अतिसेवनामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. पचनक्रिया बिघडल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अशावेळी तुम्ही आहारात तुपाच्या पाण्याचे सेवन करू शकता. तूप खाल्यामुळे पचनशक्ती वाढते.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. शिवाय यामध्ये असलेले गुणधर्म हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे निरोगी ठेवतात. तसेच ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांपासून संरक्षण होते. तुपाचे सेवन केल्यामुळे जळजळ कमी होते. त्यामुळे कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे.