बदाम खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती आणि शरीराची ऊर्जा कमी होऊन जाते. शरीराची कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी अनेकदा डॉक्टरसुद्धा ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आहारात नियमित ड्रायफ्रूटचे सेवन करावे. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुके इत्यादी अनेक प्रकार आहेत. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित ४ किंवा ५ बदामाचे सेवन करावे. बदाम खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. बदाम शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्यामुळे नियमित बदामाचे सेवन करावे. बदामामध्ये प्रथिने, विटामिन ई इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात. शिवाय बदाम खाल्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: थंडीमध्ये हाडं आणि स्नायूंच्या मजबूत आरोग्यासाठी घरी बनवा खजूरचे पौष्टिक लाडू, वाचा सोपी रेसिपी
बदामामध्ये मोनोअनसैचुरेटेड फॅटस, मॅग्नेशियम, आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो. बदाम खाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. रोजच्या आहारात बदामाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे ऊर्जा मिळवण्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया बदाम खाल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे.
बदामामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने आढळून येतात. शिवाय यामध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स, पोटॅशियम , सोडियमचे प्रमाण अधिक असते. शरीराचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रोज भिजवलेले बदाम खावेत. जेणेकरून आरोग्याला फायदे होतील. बदाम खाल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
संध्याकाळच्या वेळी छोटी मोठी भूल लागल्यानंतर तुम्ही बदामाचे सेवन करू शकता. तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी बदाम खावेत. बाजारामध्ये रोस्टेड बदाम सहज विकत मिळतात. त्यामुळे चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण झाल्यास तुम्ही रोस्टेड बदाम खाऊ शकता. बदाम खाल्यानंतर पोट भरते आणि लवकर भूक लागत नाही. यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
बदाम खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे
बदामाचे सेवन तुम्ही दुधात टाकून सुद्धा करू शकता. यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बदाम पावडर तयार करा. मिक्सरमधून बदाम बारीक वाटून घ्या. त्यानंतर गरम दुधात बदाम पावडर टाकून नियमित प्यावे. तसेच तुम्ही तुपात भाजलेले बदाम सुद्धा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता. हे बदाम खाल्यास पोट लगेच भरेल.
हे देखील वाचा: ‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कोमट पाणी ठरेल घातक, शरीरासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी बदामाचे सेवन करावे. रात्री झोपण्याआधी अर्धा वाटी पाण्यात ५ ते ६ बदाम भिजत ठेवावे. रात्रभर बदाम भिजल्यानंतर सकाळी खावेत. हे बदाम नियमित खाल्यास काही दिवसांमध्येच फरक जाणवू लागेल आणि मधुमेह नियंत्रणात राहील.