Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थॅलेसेमियाग्रस्तांच्या स्वप्नांना मिळणार बळ! ‘चाइल्ड हेल्प फाऊंडेशन’कडून विशेष केंद्राची स्थापना

बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या दीर्घकालीन आणि खर्चिक उपचार प्रक्रियेत कुटुंबांना अनेक अदृश्य आव्हानाचा सामना करावा लागतो. यामुळे उपचार कालावधीत मुलांचे शिक्षण खंडित न होता त्यांना एक सामान्य जीवन जगल्याची जाणीव होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 07, 2026 | 02:20 PM
थॅलेसेमियाग्रस्तांच्या स्वप्नांना मिळणार बळ! 'चाइल्ड हेल्प फाऊंडेशन'कडून विशेष केंद्राची स्थापना

थॅलेसेमियाग्रस्तांच्या स्वप्नांना मिळणार बळ! 'चाइल्ड हेल्प फाऊंडेशन'कडून विशेष केंद्राची स्थापना

Follow Us
Close
Follow Us:

बालकल्याण आणि मानवतावादी सेवा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या ‘चाइल्ड हेल्प फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. थैलेसेमिया आणि इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मुंबईत येणाऱ्या मुलांसाठी संस्थेने ‘होम फॉर बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ या विशेष केंद्राची स्थापना केली आहे. हे केंद्र केवळ निवारा नसून, रुग्णालयाच्या भिंतीबाहेरही मुलांच्या आरोग्याची आणि कुटुंबाच्या मानसिक धैर्याची काळजी घेणारे एक सुरक्षित ठिकाण ठरत आहे. चाइल्ड हेल्प फाऊंडेशनने आजवर ४,२२६ पेक्षा जास्त बालकांना जीवघेण्या आजारांतून बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली आहे.(फोटो सौजन्य – istock)

‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा

बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या दीर्घकालीन आणि खर्चिक उपचार प्रक्रियेत कुटुंबांना अनेक अदृश्य आव्हानाचा सामना करावा लागतो, हीच गरज ओळखून ‘होम फॉर बीएमटी’च्या माध्यमातून राहण्याची सोय, पौष्टिक आहार, प्रवासासाठी मदत आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेने उचलली आहे. यामुळे उपचार कालावधीत मुलांचे शिक्षण खंडित न होता त्यांना एक सामान्य जीवन जगल्याची जाणीव होते.

या उपक्रमाबद्दल माहिती देताना ‘चाइल्ड हेल्प फाऊंडेशन’चे कार्यकारी संचालक जिजी ऑन म्हणाले की, ‘होम फॉर बीएमटीची निर्मिती ही केवळ वैद्यकीय मदत नसून ती मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या भावनिक आणि व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेली एक व्यवस्था आहे. महागडे उपचार परवडत नसलेल्या कुटुंबांवरील ओझे कमी करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.’

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

उपचार केवळ औषधांनी होत नाहीत, तर त्यासाठी पोषक वातावरण आणि आश्वासक आधाराची गरज असते, असा संस्थेचा विश्वास आहे. नियमित आहार, राहण्याची स्थिर जागा आणि सातत्यपूर्ण शिक्षण या गोष्टींमुळे मुलांमध्ये आत्मसन्मानाने जगण्याची जिद्द निर्माण होते. प्रतिकूल परिस्थितीतही पालकांना आशेचा किरण दाखवणारे हे केंद्र समाजासाठी एक मोठे योगदान ठरत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The dreams of thalassemia sufferers will get strength establishment of special center by child help foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Mumbai News

संबंधित बातम्या

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर
1

भारताची अणुक्षेत्रात मोठी झेप! ‘Isomed 2.0’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया झाली अधिक वेगवान, वाचा सविस्तर

‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा
2

‘स्ट्रोक’साठी सर्वसमावेशक आराखडा! समिट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली महाराष्ट्र स्ट्रोक समिटमध्ये तज्ज्ञांची चर्चा

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे
3

आता पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर; मुंबई पोलिसांना मिळणार अमेरिकन स्टाईल बॉडी-वॉर्न कॅमेरे

‘हा’ आहे महाराष्ट्राचा राज्यमासा! पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी, जाणून घेऊया माशाबद्दल सविस्तर माहिती
4

‘हा’ आहे महाराष्ट्राचा राज्यमासा! पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी, जाणून घेऊया माशाबद्दल सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.