या व्यक्तींनी करू नये कोमट पाण्याचे सेवन
सर्वच ऋतूंमध्ये कोमट पाणी प्यायले जाते. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक लोक नियमित कोमट पाण्याचे सेवन करतात. वाढलेले वजन कमी कारण्यासाठी, सर्दी खोकला झाल्यानंतर आराम मिळवण्यासाठी कोमट पाणी प्यायले जाते. अनेकदा डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते सुद्धा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण खरंच कोमट पाणी आरोग्यासाठी चांगले आहे का? असा प्रश्न तुम्हालासुद्धापडला असेल ना. पण सतत कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी कोमट पाण्याचे सेवन करून नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: थंडीमध्ये हाडं आणि स्नायूंच्या मजबूत आरोग्यासाठी घरी बनवा खजूरचे पौष्टिक लाडू, वाचा सोपी रेसिपी
सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर अनेकदा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या जातात. पण कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे घशाला सूज येऊन घशामध्ये जळजळ वाढू लागते. तसेच यामुळे घशामधील वेदना आणखीन वाढू शकतात. त्यामुळे नियमित कोमट पाण्याचे सेवन करण्याऐवजी साध्या पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे घसा कोरडा होण्यास मदत होते.
लहान मुलांना कोमट पाण्याचे सेवन करण्यास देऊ नये. लहान मुलांची पचनसंस्था अतिशय नाजूक असते, त्यामुळे कोमट पाण्याचे सेवन करून पचनसंस्था बिघडण्याची शक्यता असते. लहान मुलांना नेहमीच साधे पाणी द्यावे. लहान मुलांना गरम पाणी दिल्यानंतर पोटासंबंधित समस्या उद्भवून मुलांचे आरोग्य बिघडू शकते.
या व्यक्तींनी करू नये कोमट पाण्याचे सेवन
यकृता संबंधित समस्या असलेल्या रुग्णांनी कोमट पाण्याचे चुकूनही सेवन करू नये. यामुळे यकृतावर दाब येतो आणि आरोग्य बिघडते. यकृताच्या रुग्णांनी शक्यतो थंड किंवा साध्या पाण्याचे सेवन करावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराच्या इतर अवयवनावर आणि शरीराच्या कार्यवर परिणाम होण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा:कामाच्या ठिकाणी असलेले प्रेशर ठरते ‘या’ आजाराला कारणीभूत; तुम्ही नाही ना याचे शिकार?
दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यास कोमट पाण्याचे सेवन करू नये. कोमट पाणी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे दातांमधील संवेदनशीलपणा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कोमट किंवा थंड पाणी पिऊ नये.