घरी बनवा खजूरचे पौष्टिक लाडू
थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जेची आवशक्यता असते. कारण या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असतो. तसेच सगळीकडे थंड आणि दमदाट असे वातावरण असते. या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर दिसू लागल्यानंतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने खजूरचे सेवन केले जाते. खजूर खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले पौष्टिक घटक बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर 1 किंवा 2 खजुराचे सेवन करावे.(फोटो सौजन्य-istock)
खजूरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक गुणकारी घटक आढळून येतात, ज्यामुळे हाडांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात खजूरचे सेवन करावे. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहील. खजूरमध्ये विटामिन ए आणि बटा-कॅरोटिन आढळून येते. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांमध्ये हाडांच्या मजबूत आरोग्यासाठी खजुराचे लाडू कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: कोथिंबीर नाही तर कोबीची खमंग वडी बनवून पहा
हे देखील वाचा: लहान मुलांसाठी घरीच तयार करा क्रिस्पी मिनी सामोसा, नोट करा सिंपल रेसिपी