
कच्च्या लसणीचे सेवन केल्याने आरोग्याला होणारे फायदे
लसणीचा वापर पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. लसणीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यसाठी सुद्धा फायदेशीर आहेत. फोडणीमध्ये लसूण नसेल तर जेवणाची चव अगदी बेचव लागते, त्यामुळे फोडणी किंवा मसाले बनवण्यासाठी लसणीचा वापर केला जातो. चवीला तिखट असलेली लसूण आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आणि गुणकारी आहे. लसणीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, त्यामुळे आहारात लसणीचा वापर केला जातो. मागील अनेक वर्षांपासून लसणीचा वापर आयुर्वेदामध्ये केला जात आहे. आरोग्यसंबंधित गंभीर आजार बरे करण्यासाठी लसूण प्रभावी आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी कच्च्या लसणीचे सेवन केल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
सतत तेलकट किंवा तिखट अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पण गोळ्या औषध खाऊन आजार बरे करण्यापेक्षा घरगुती उपाय करावेत. कोलेस्ट्रॉलची समस्या तरुणांमध्ये वाढल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढला आहे.त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लसणाचे सेवन करावे.
लसणीचे सेवन केल्याने संधिवाताच्या समस्येपासून आराम मिळतो. लसणीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. लसणीचे सेवन केल्यामुळे वेदना आणि सांधेदुखीच्या लक्षणांपासून आराम मिळतो.
कच्च्या लसणीचे सेवन केल्याने आरोग्याला होणारे फायदे
हे देखील वाचा: सकाळी उठल्यावर दुधाचा चहा पित असाल तर थांबा! उद्भवू शकतात आरोग्यासंबंधित समस्या
लसणीच्या पाकळ्यांमध्ये ॲलिसिन आढळून येते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांनी लसणीचे सेवन करावे. यामुळे हृद्यासंबंधित आजार बरे होतात.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी लसणीचा काढा प्यावा. हा काढा बनवण्यासाठी सुद्धा सोपा आहे. वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. लसणीमध्ये असलेले विटामिन C आणि B6 रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते.