Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅट बर्न करण्यासाठी प्रभावी ठरेल ताक! एक ग्लासभर ताकात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ, झपाट्याने कमी होईल पोटावरची चरबी

दुपारच्या जेवणात किंवा सकाळी उपाशी पोटी नियमित एक ग्लासभर ताक प्यायल्यास आतड्यांमध्ये घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. जाणून घ्या ताकात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 14, 2026 | 08:34 AM
फॅट बर्न करण्यासाठी प्रभावी ठरेल ताक! एक ग्लासभर ताकात मिक्स करून प्या 'हे' पदार्थ, झपाट्याने कमी होईल पोटावरची चरबी

फॅट बर्न करण्यासाठी प्रभावी ठरेल ताक! एक ग्लासभर ताकात मिक्स करून प्या 'हे' पदार्थ, झपाट्याने कमी होईल पोटावरची चरबी

Follow Us
Follow Us:

ताक पिण्याचे फायदे?
ताकात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे?
गट हेल्थ सुधारण्यासाठी काय करावे?

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हात कुठेही जाऊन आल्यानंतर अंगाची काहिली होते. याशिवाय शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे उन्हापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या थंड पेयांचे सेवन केले जाते. त्यात आवर्जून प्यायले जाणारे पेय म्हणजे ताक. दुपारच्या जेवणात वाटीभर दही आणि एक ग्लासभर ताक प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. ताक प्यायल्यामुळे शरीरात वाढलेली ऍसिडिटी कमी होते, पचनक्रिया सुधारते, याशिवाय शरीराला गारवा सुद्धा मिळतो. तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित एक ग्लासभर ताक प्यावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी एक ग्लासभर ताकात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

Water Retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? ‘हे’ उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम

वाढलेले वजन कमी करण्यासाठी सतत वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. सप्लिमेंट्स, डाएट, सतत व्यायाम इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चुकीचा डाएट आणि जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नियमित एक ग्लासभर ताक प्यायल्यास झपाट्याने शरीरावर जमा झालेली चरबी वितळून जाईल आणि तुम्ही बारीक व्हाल. ताकात असलेले प्रोबायोटिक्स पचनक्रिया चांगली ठेवतात. याशिवाय आतड्यांमध्ये चांगल्या विषाणूची वाढ होण्यासाठी ताक पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. रोज सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारच्या जेवणात एक ग्लासभर ताक प्यायल्यास वजन कमी होईल.

पोषक घटकांनी समृद्ध असलेले ताक केवळ शरीरासाठीच नाहीतर त्वचा आणि केसांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. ताकामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस,विटामिन बी-१२ आणि रायबोफ्लेविन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय ताकात ११०० कॅलरीज, ९ ग्रॅम प्रोटीन आणि ३ ग्रॅम फॅट असतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला तात्काळ ऊर्जा मिळवण्यासाठी आणि शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी ताक प्यावे. हाडांची वाढलेली झीज रोखण्यासाठी ताक फायदेशीर ठरेल.

वयाच्या साठीनंतर छातीतील संसर्ग ठरू शकतो जीवघेणा! वेळीच घ्या योग्य उपचार; श्वसन रोगतज्ज्ञांनी केले आवाहन

ताक बनवताना मिक्सरच्या भांड्यात दही घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पुदीना, कोथिंबीर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, मीठ, काळीमिरी पावडर घालून वाटून घ्या. त्यानंतर दह्याच्या मिश्रणात बर्फाचे खडे टाकून मिक्स करून घ्या. ताक बनवल्यानंतर ते लगेच प्यावे. फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवल्यास त्यातील आवश्यक घटक नष्ट होतात. दुपारच्या जेवणांतर आवर्जून ताक प्यावे. ताकाची कढी, ताकाचे पिठलं इत्यादी पदार्थ सुद्धा तुम्ही बनवू शकता. ताक प्यायल्यामुळे शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी ताक प्यावे. गट हेल्थ सुधारण्यासाठी ताक किंवा दह्याचा आहारात समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ताक पिण्याने वजन कमी होते का?

    Ans: हो, ताक कमी कॅलरीचे असून पचन सुधारते आणि शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते.

  • Que: ताकात कोणते पदार्थ मिसळल्यास अधिक फायदा होतो?

    Ans: जिरे पावडर, काळे मीठ, आलं आणि कोथिंबीर मिसळल्यास पचन सुधारते आणि फॅट बर्न होण्यास मदत होते.

  • Que: ताक कधी पिणे योग्य आहे?

    Ans: जेवणानंतर किंवा दुपारी ताक पिणे अधिक फायदेशीर ठरते, कारण ते पचनक्रिया सुधारते.

Web Title: Will be effective to burn fat mix a glass of buttermilk and drink this food belly fat will reduce rapidly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • buttermilk
  • gut health
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या
1

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत
2

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
3

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
4

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.