Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? ‘हे’ उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम

शरीरात साचून राहिलेल्या पाण्यामुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन केल्यास लघवीवाटे शरीरातील पाणी बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2026 | 02:06 PM
Water retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? 'हे' उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम

Water retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? 'हे' उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम

Follow Us
Follow Us:

शरीरात पाणी कशामुळे साचून राहते?
वॉटर रिटेन्शन म्हणजे काय?
वॉटर रिटेन्शन करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

वजन करण्याऱ्यांसाठी वजन काट्यावर उभं राहिल्यानंतर आलेले वजन पाहून अनेकांना धक्काच बसतो. झपाट्याने १ किंवा २ किलो वजन वाढल्यानंतर चिंता व्यक्त केली जाते. पण हे अचानक वाढलेले वजन नसून शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये साचून राहिलेले पाण्याचे प्रमाण आहे. शरीराच्या हात, पाय, घोटे आणि पोटाच्या भागात सूज जाणवण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. मानवी शरीरात ६० टक्के पाणी असते. शरीराच्या पेशींमध्ये किंवा उतींमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी साचून राहते, त्या स्थितीला वॉटर रिटेन्शन असे म्हंटले जाते. शरीरात पाणी साचून राहण्यास सुरुवात झाल्यानंतर शरीर केवळ फुगल्यासारखे वाटते. यामुळे कपडे घट्ट होणे, अंगावर व्यवस्थित कपडे न बसने इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात साचून राहिलेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंडाची चव खराब होते? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या सविस्तर

शरीरात पाणी साठण्याची मुख्य कारणे:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. त्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसू लागतो. बऱ्याचदा आहारात अनेकांना खूप जास्त प्रमाणात मीठ खाण्याची सवय असते. मिठातील सोडियम पाण्याला जखडून ठेवते. त्यामुळे तुम्ही जितके जास्त मीठ खाल तेवढेच शरीरात पाण्याचे प्रमाण वाढू लागेल. शरीरात १ ग्रॅम ग्लायकोजेन ३ ते ४ ग्रॅम पेक्षा जास्त पाणी तयार करते. यामुळे शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊन पाण्याची पातळी वाढू लागते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे शरीरात पाणी साचून राहते.

शरीरात साचून राहिलेले पाणी कमी करण्यासाठी उपाय:

वजन कमी करताना किंवा दीर्घकाळ निरोगी राहायचे असल्यास आहारात कमीत कमी प्रमाणात मीठ खावे. मिठाच्या अतिसेवनामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. लोणचे, पापड आणि बाहेरील अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ असते. त्यामुळे हे पदार्थ खावे टाळावे. कमी मिठाचे सेवन केल्यास किडनी शरीरातील विषारी घटक पाण्यावाटे बाहेर काढून टाकेल. याशिवाय पोटॅशियम हे सोडियमच्या विरुद्ध काम करते. याशिवाय आहारात केळी, एवोकॅडो, पालक आणि रताळी इत्यादी पोटॅशियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनामुळे लघवीवाटे विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्यावेळी कमी पाण्याचे सेवन केले जाते तेव्हा शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये जाते. यामुळे शरीरात पाण्याचा साठा वाढतो. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे लघवीवाटे विषारी घटक बाहेर पडून जातात.

वयाच्या साठीनंतर छातीतील संसर्ग ठरू शकतो जीवघेणा! वेळीच घ्या योग्य उपचार; श्वसन रोगतज्ज्ञांनी केले आवाहन

दैनंदिन आहारात काकडी, लिंबू पाणी, आले आणि ग्रीन टी नैसर्गिक डाय्युरेटिक्स पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते. तसेच जास्त व्यायाम किंवा घाम गाळल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. तसेच शरीराचे रक्ताभिसरण सुधारल्यामुळे द्रवपदार्थ पुन्हा प्रवाहित होतात. त्यामुळे नियमित भरपूर पाण्यासोबत पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे सुद्धा आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वॉटर रिटेन्शन म्हणजे काय?

    Ans: वॉटर रिटेन्शन म्हणजे शरीरात अतिरिक्त पाणी साठणे. यामुळे सूज येणे, वजन वाढल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.

  • Que: वॉटर रिटेन्शन का होते?

    Ans: जास्त मीठाचे सेवन, कमी पाणी पिणे, हार्मोनल बदल, कमी शारीरिक हालचाल आणि काही औषधांमुळे हा त्रास होऊ शकतो.

  • Que: वॉटर रिटेन्शनमुळे लठ्ठपणा वाढतो का?

    Ans: खरं तर हा चरबी नसून पाण्याचे प्रमाण वाढते. योग्य उपाय केल्यास हे कमी होऊ शकते आणि शरीर पुन्हा नॉर्मल दिसू शकते.

Web Title: Does water retention make you look overweight try these simple remedies to flush out excess fluid and look slim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • obesity
  • Weight loss

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
2

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
3

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
4

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.